वर्ल्डकप चालु असताना कॅप्टन बदलण्याची इंग्लडवर ‘नामुष्की’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी वर्ल्डकप स्पर्धा इंग्लंडमध्ये सुरु असून यजमान इंग्लंडचा संघ या स्पर्धेत उत्तम फॉर्ममध्ये असून त्यांचे सेमीफायनल मधील स्थान जवळपास नक्की समजले जात आहे. मात्र स्पर्धा जशी पुढे जाईल, त्याप्रमाणे सर्व निकाल उघड होत जातील आणि कोणता संघ सेमीफायनलमध्ये जातो हे स्पष्ट होईल. इंग्लंडचे सध्या ६ गुण असून गुणतालिकेत ते चौथ्या क्रमांकावर आहेत. मात्र आता इंग्लडला एक मोठा धक्का बसला आहे.

सर्वच संघाना दुखापतीने ग्रासलेले असताना आता इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन जखमी झाल्यामुळं आज अफगाणिस्तान विरोधात होणाऱ्या सामन्यात तो खेळणार की नाही याबद्दल शंका आहे. मागील सामन्यात देखील जखमी असल्याने तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला नव्हता. त्यामुळे या सामन्यात देखील त्याच्या खेळण्यावर साशंकता आहे. शुक्रवारी वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या सामन्यात मॉर्गनच्या पाठीचे स्नायू आकडल्यामुळं त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे त्याच्या जागी उपकर्णधार जोस बटलर हा कर्णधारपद सांभाळण्याची शक्यता आहे. त्याला दुखापत झाली असली तरी त्याची हि दुखापत किती गंभीर आहे आणि तो आणखी किती सामन्यांत खेळणार नाही याची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, याआधीदेखील भारतीय संघातील खेळाडू शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार जखमी झाल्याने या स्पर्धेतील काही सामन्यांत खेळू शकणार नाहीत.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन