ICC World Cup 2019 : इंग्लंडला मोठा झटका, महत्त्वाच्या सामन्याआधी मुख्य खेळाडू जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत सर्वच संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टीम ११ पॉईंट्स मिळवत अव्वल स्थानावर आहे.

दुसऱ्या स्थानावर १० पॉईंट्स मिळवत ऑस्ट्रेलिया आहे. टीम इंडिया ९ पॉईंट्नी तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लड आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत भारत ज्याप्रकारे खेळत आहे आणि सध्या भारतीय संघाचा फॉर्म बघता या स्पर्धेत भारतीय संघालाच संभाव्य विजेते म्हणून पहिले जात आहे.

कर्णधार विराट कोहली आणि त्याचे  शिलेदार या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत असून भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. हि स्पर्धा आता मध्यावर आली असून त्यामुळे गुणतालिकेत सर्वात वर असलेले चार संघच सेमीफायनलमध्ये जाणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

मात्र या सगळ्यात  इंग्लंडचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असला तरीही या स्पर्धेत त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर उर्वरित तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत विजय मिळवणे आवश्यक आहे. मात्र या सगळ्या परिस्थितीत त्यांना मोठा झटका बसला आहे. सलामी फलंदाज जेसन रॉय  महत्त्वाच्या सामन्यांना मुकणार आहे.

इंग्लंडला आता ऑस्ट्रेलिया, भारत व न्यूझीलंड या तीन तगड्या प्रतिस्पर्धींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं या खेळाडूचं संघात नसणं इंग्लंडला महागात पडणार आहे. त्यामुळे आगामी सामन्यांत त्यांची कामगिरी कशी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पायाचे  स्नायू आकडल्यामुळं ऑस्ट्रेलियाविरोधात तो खेळू शकणार नाही. विंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात तो जखमी झाला होता. त्यानंतर आता तो आजच्या सामन्यात खेळू शकणार नाही. याआधीही श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध तो खेळू शकला नाही.
दरम्यान, जेसन रॉय या स्पर्धेत उत्तम फॉर्ममध्ये असून त्याने बांगलादेशविरुद्ध शानदार शतकी खेळी केली होती. त्यामुळे तो लवकरात लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना इंग्लंडचे चाहते आणि खेळाडू नक्कीच करत असणार.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’