बसस्थानकातून वृद्ध महिलेची पर्स चोरट्यांकडून लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन –  उन्हाळा संपत चालला असुन लग्नसराई शेवटच्या टप्प्यात जोर धरु लागली आहे. त्यामुळे बस स्थानकावर प्रवांशाची गर्दी हि चांगलीच वाढली आहे. या गर्दीचा फायदा घेण्यासाठी चोरटे हि संधीचे सोने करताना दिसुन येत आहे.त्याच प्रत्यय आज बुधवारी दुपारी बस स्थानकात घडली.

धुळे हुन साक्रि कडे जाण्यासाठी बस उशीरा स्थानकात दाखल झाली. दुपारी तीन दरम्यान बस मध्ये चढतेवेळी शोभा सुरेश पाटील वय.60 ह्या महिलेच्या खांद्यावरील पिशवीतील पर्स चोरट्यांने गर्दीचा फायदा घेत लंपास केली. वृध्द महिलेच्या लक्षात येताच तिने सदर बाब जवळच असलेल्या मुलीला शैलजा पाटील यांना सांगितली. तिने लगेचच बस स्थानकातील चौकीत असलेल्या पोलीस कर्मचारी अब्बास शेख यांना माहिती दिली. त्यांनी बस शहर पोलीस ठाण्यात प्रवाशांसह आणली. बस मधील प्रवाशांच्या साहित्यांची तपासणी करण्यात आली.

वृध्द महिलेच्या पर्स मधील रोख रक्कम 3 हजार चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लुटुन नेले. वृध्द महिलेने तक्रार न दिल्याने प्रवासी भरलेली बस शेवटी शहर पोलीस स्टेशन मधुन साक्री कडे मार्गस्थ झाली.

You might also like