ICC World Cup 2019 : विराटचा मोठा खुलासा, ‘या’ कारणांमुळे झाला पराभव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत काल झालेल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव करत धडाक्यात फायनलमध्ये प्रवेश केला. भारताला न्यूझीलंडकडून ८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. २४० या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची वरची फळी ढेपाळली. त्यानंतर दडपण आलेला भारतीय संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही.

एकवेळ सामन्यात भारताची ६ बाद ९२ अशी दयनीय अवस्था झाली होती. मात्र महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी शतकी भागीदारी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र शेवटच्या दोन षटकांत सामन्याचे पारडे फिरले आणि जडेजा बाद झाला. आणि त्यानंतर धोनी धावबाद झाल्याने भारताच्या फायनलमध्ये खेळण्याच्या स्वप्नाला सुरुंग लागला. भारताचा संपूर्ण संघ २२१ धावांवर बाद झाला.

यामुळे झाला भारताचा पराभव

सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहली याने भारताच्या पराभवाची कारणे सांगितली. हा पराभव झाल्यानंतर देखील कोहलीने भारतीय संघाचे कौतुक केले. “भारत फक्त ४५ मिनीटांच्या खेळीमुळं हरला” असे त्याने पराभवाची समीक्षा करताना सांगितले. त्याचवेळी त्याने धोनी आणि जडेजाच्या खेळीचे कौतुक देखील केले. “वाईट वाटत आहे. जेव्हा तुम्ही संपुर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करता आणि शेवटी बाहेर पडता याचे सर्वात जास्त दुःख होते, असंदेखील तो यावेळी म्हणाला. त्याचबरोबर त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचे देखील त्याने कौतुक केले.

दरम्यान, आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनाचा सामना होत असून या सामन्यातील विजेता संघ रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये न्यूझीलंडशी भिडणार आहे.

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या