बरं झालं ! भारत-पाक क्रिकेट सामन्यात पाऊस पडला तर टीम इंडियाच ‘सरस’ ; जाणून घ्या काय आहे कारण

लंडन :वृत्तसंस्था : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामान होणार आहे. त्या अगोदर सोशल मीडियावर दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडले गेले आहे. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात हा सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने क्रीडा रसिक आणि भारतीय पाठीराखे चिंतेत आहेत. त्यामुळे सगळ्यांचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार ? हा प्रश्न साहजिकच सर्वांना पडला असणार. त्यामुळे उद्या हवामान खात्याने देखील मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दिवसभरात तीनवेळा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हा सामना रद्द जरी झाला तरी याचा फायदा मात्र भारतालाच होणार आहे. कारण भारतीय संघाने आतापर्यंत तीन सामने खेळणे असून यात भारतीय संघाचे पाच गुण  झाले आहेत. यानंतर भारताचा बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांसारख्या तुलनेने दुबळ्या संघांशी सामना होणार असून यात भारत सहज विजय मिळवेल.

त्यामुळे सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी भारताला जास्त कष्ट पडणार नाहीत. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने एकूण चार सामने खेळले असून त्यांचे तीन गुण  आहेत. त्यामुळे त्यांना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो.दरम्यान, पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी भारतीय प्रेक्षक आणि पाठीराखे मात्र पाऊस न पडण्याची प्रार्थना करत आहे. त्यामुळे आता उद्या मैदानावर काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्याविषयक वृत्त

अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे

केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

अर्थरायटिसला दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका