सट्टेबाजारात देखील भारत-पाक क्रिकेट मॅच ‘रेकॉर्डब्रेक’, लागला होता ‘इतक्या’ कोटींचा सट्टा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला ८९ धावांनी पराभूत करत आपली या स्पर्धेतील चांगली कामगिरी कायम राखली. काल झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानसमोर ३३६ धावांचे लक्ष ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानच संघ फक्त २१२ धावाच करू शकला. भारताकडून रोहित शर्मा याने शानदार शतकी खेळी करत १४४ धावा केल्या. या स्पर्धेत भारताने सलग सातवेळा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. या विजयासह भारतीय संघ ७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. य सामन्यात सलग सात वेळा पाकिस्तानला पराभूत करण्याच्या विक्रमासह अनेक विक्रम केले आहेत.

याचबरोबर या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टाबाजारात सट्टा लावण्यात आला होता. या हायवोल्टेज सामन्यांत सट्टेबाजारातही मोठी उलथापालथ झाली. या सामन्यावर तब्बल ८०० कोटींचा सट्टा लावण्यात आला होता. या सामन्यात सर्वाधिक सट्टा हा भारतावर लावण्यात आला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पावसामुळं या सट्ट्यावर काहीही परिणाम झाला नाही. भारतावर १. ८५ पैसे भाव लावण्यात आला आहे. तर, पाकिस्तानवर २. १६ रुपये भाव लावण्यात आला होता. त्यामुळे सट्टा बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असताना पोलिसांनी देखील विविध ठिकाणी छापा टाकून सट्टा लावणाऱ्यांना अटक केली आहे.

दरम्यान, या सगळ्या सट्टा प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ११० लोकांनी सट्टा लावला होता. यामध्ये सर्वात जास्त १६ ते ३५ वयोगटातले तरुण होते.

सिनेजगत

‘लस्ट स्टोरीज’मधील ‘व्हायब्रेटर सीन’बाबत कियारा आडवाणीचा मोठा ‘खुलासा’

दोन पत्नीसोबत राहतो ‘हा’ मोठा सिंगर, ज्याचे आहेत लाखो ‘फॅन’

‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…

Video : छोटया पडद्यावरील ‘हॉट’ अभिनेत्री निया शर्माची ‘सोशल’वर धुमाकूळ