‘हा’ खेळाडू म्हणतो भारताला हरवण्यासाठी पाकिस्तानमध्ये नाही ‘दम’ !

लंडन : वृत्तसंस्था – क्रिकेट वर्ल्डकप २०१९ ला सुरुवात झाली असून दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघानी तगड्या संघाना झटका देत विजय मिळवला आहे. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाची देखील जबरदस्त तयारी सुरु असून भारतीय संघ स्पर्धेतील आपला पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेबरोबर खेळणार आहे. त्याअगोदर झालेल्या सराव सामन्यात भारतानं न्युझीलंड विरोधात सामना गमावला होता तर, बांगलादेश विरोधात सामना जिंकला होता. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ या सामन्यासाठी पूर्ण तयार आहे. मात्र या सगळ्यात १६ जून रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

या सगळ्यात भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने एक वक्तव्य केले आहे. भारताला पराभूत करण्याचा पाकिस्तानमध्ये दम नसल्याचे त्याने म्हटले आहे. विंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात पत्कराव्या लागलेल्या दारुण पराभवानंतर काल इंग्लंडविरुद्ध विजय मिळवत त्यांनी दमदार वापसी केली आहे. यंदाच्या विश्वचषकात माजी खेळाडू आणि क्रिकेट जाणकारांनी विराटसेनेला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून घोषित केले आहे. त्यामुळं साऱ्यांचेच लक्ष भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे लागलेले आहे. त्यामुळे हरभजन सिंगच्या या वक्तव्यानंतर आता काय घडते हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.

दरम्यान, आजपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्डकपमध्ये खेळवण्यात आलेल्या ६ पैकी सहा सामन्यांत भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे.