विश्वकप २०१९ : अंधश्रद्धाळू धोनी सामन्याआधी करतो ‘हे’ काम !

लंडन : वृत्तसंस्था –  भारतीय संघ वर्ल्डकप स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात घाम गाळत असून या स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेबरोबर खेळणार आहे. मात्र त्याआधी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ मैदानावर उतरण्यासाठी आतुर झालेला आहे. मात्र या सामन्याआधी भारतीय संघाचा विकेटकिपर महेंद्रसिंग धोनी याने मोठा खुलासा केला आहे.

त्याने खासगी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. यावेळी त्याने मैदानावर घडणाऱ्या किस्स्यांबरोबरच आपल्या अंधश्रद्धाळूपणाबद्दल देखील भाष्य केले. यावेळी बोलताना तो म्हणाला कि, खूप खेळाडू कोणत्यातरी गोष्टींवर विश्वास ठेवत असतात. त्यामुळं मी सुध्दा अंधश्रद्धाळू आहे. तो म्हणाला कि, मी मैदानावर उतरताना आधी उजवा पाय मैदानात ठेवतो. मात्र यात देखील माझा गोंधळ उडतो. धोनी खेळताना ७ नंबरची जर्सी वापरतो. कारण त्याचा वाढदिवस हा ७ जुलैला असल्याने धोनी सात क्रमांक लकी मानतो, त्यामुळे तो त्या नंबरची जर्सी वापरतो. या ७ नंबरच्या आकड्याला तो त्याच्या या यशाचे श्रेय देतो. तसेच, धोनीनं माझ्याकडे उपाय असतात तेव्हा मी चांगला विचार करु शकतो, असेही यावेळी म्हटले.

दरम्यान, या सगळ्यात भारतीय संघाला दुखापतींनी देखील घेरले आहे. केदार जाधव, विराट कोहली हे जखमी असल्याने पहिल्या सामन्यात खेळणार कि नाही हे नक्की नाही. त्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराची आज डोप टेस्ट झाल्याने भारतीय संघाची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

Loading...
You might also like