अभिमानास्पद ! महेंद्रसिंह धोनीच्या ग्लोव्हजवर ‘पॅरा स्पेशल फोर्स’चं चिन्ह

लंडन : वृत्तसंस्था – क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून भारताने विजयी सुरुवात केल्याने भारतीय चाहते आनंदात आहेत. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय संघाच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष आहे. या स्पर्धेत भारत एकूण नऊ सामने खेळणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाची मदार ही कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीबरोबरच जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमीवर असणार आहे. भारतीय संघ जरी या स्पर्धेत नऊ सामने खेळणार असला तरी सर्वांचे लक्ष हे भारत आणि पाकिस्तान यांच्या १६ जून रोजी रंगणाऱ्या सामन्याकडे लागले आहे.वर्ल्डकप मध्ये काल झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सहा विकेट्सनी पराभव करत भारतीय चाहत्यांची मने जिंकली.

मात्र त्याचबरोबर भारतीय यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनी याच्या एका कृतीने भारतीयांची छाती अभिमानाने फुगली आहे. त्याला कारणही तसेच विशेष आहे. यष्टीरक्षण करताना धोनीच्या ग्लोव्ह्जवर एक खास चिन्ह दिसून आले. हे चिन्ह होते, पॅरा स्पेशल फोर्स. या चिन्हाला बलिदान चिन्हही म्हटले जाते. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.याअगोदर २०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर महेंद्रसिंह धोनीला भारतीय लष्करातर्फे मानाची लेफ्टनंट कर्नल ही पदवी बहाल करण्यात आली होती. यासोबतच धोनीने पॅराट्रूपिंगचे प्रशिक्षण देखील घेतले आहे.

https://twitter.com/jagdishjd07/status/1136480779414908928

दरम्यान, याआधी कोणत्याही खेळाडूने भारतीय सैन्याचे चिन्ह असलेली वस्तू वापरली नसल्याने सध्या सर्व स्तरातुन धोनीचे यासाठी कौतुक केले जात आहे.