वर्ल्डकप २०१९ : पाकिस्तानी चाहत्यांनी टाकली ‘किंग’ कोहलीसमोर ‘नांगी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास दोन सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात  भारताने शानदार ३६ धावांनी  विजय मिळवत आपला दुसरा विजय साजरा केला. त्यानंतर आता भारत आपला पुढील सामना १३ जून रोजी न्यूझीलंडबरोबर तर १६ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर खेळणार आहे.

मात्र त्याआधी ट्विटरवर भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावाची जर्सी घालणाऱ्या चाहत्याचा एक फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहे. विराट कोहलीचे चाहते जगभर आहेत. तसेच ते पाकिस्तानमध्ये देखील आहेत. त्यामुळं पाकिस्तानच्या चाहत्यांनीही विराट कोहलीसमोर नांगी टाकली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे १६ जून रोजी होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्यात कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तिकिटखरेदीत देखील भारतीय वरचढ

भारत आणि पाकिस्तान यांच्या होणाऱ्या सामन्याच्या तिकिटखरेदीत देखील भारतीय पाकिस्तानी चाहत्यांवर वरचढ ठरताना दिसून येत आहे. या सामन्याची ६७ टक्के तिकिटे हि भारतीयांनी खरेदी केली आहेत. तर पाकिस्तानी चाहत्यांना फक्त १८ टक्के तिकिटे मिळाली आहेत. त्यामुळे आता या सामन्यात खेळडूंप्रमाणेच चाहत्यांमध्ये देखील लढाई पहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे क्रिकेट लंकाशायर या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामन्याच्या तिकीट केवळ ४८ तासांत विकली गेली आहेत.