ICC World Cup 2019 : भारताचा पराभव झाल्याने सेमीफायनलमध्ये ‘कोण’ याची उत्सुकता, ‘हे’ संघ शर्यतीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील काल झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने भारताला पराभूत करत सेमीफायनलमधील आपल्या प्रवेशाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. काल झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा ३१ धावांनी पराभव केला. यानंतर आता सेमीफायनलची रेस आणखीनच चुरशीची झाली आहे. कालच्या सामन्यात विजय मिळवत इंग्लंडने सेमीफायनल रेसमधील आपले स्थान कायम राखले आहे. या विजयासह गुणतालिकेत इंग्लंड १० गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून या विजयाचा अनेक संघांना फटका बसला आहे.

सध्या गुणतालिकेत १४ गुणांसह ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर असून न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर असून भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर काल मिळवलेल्या विजयानंतर इंग्लंड चौथ्या स्थानावर पोहोचले आहे. या स्पर्धेत इंग्लंडचा एक सामना बाकी असून त्यांना न्यूझीलंडविरुद्ध लढायचे आहे. त्यामुळे त्यांना या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडलादेखील या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. पाकिस्तानला मात्र आपल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या सामन्यात इंग्लड पराभूत होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

जर न्यूझीलंड या सामन्यात पराभूत झाले आणि पाकिस्तानने विजय मिळवला तर सर्वोत्तम धावगतीच्या बळावर न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. ऑस्ट्रेलियाने याआधीच सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तसेच भारतीय संघाचे अजून दोन सामने बाकी असून यापैकी एका सामन्यात विजय मिळवला तरी देखील भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.

श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांचे आव्हान याआधीच संपुष्टात आल्याने भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघात सेमीफायनलमधील तीन स्थानांसाठी टक्कर पाहायला मिळणार आहे. मात्र भारत आणि न्यूझीलंड यांची धावगती चांगली असल्याने त्यांचा सेमीफायनल प्रवेश नक्की आहे. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

कोवळे ‘पिंपळपान’ हृदयातील ब्लॉकेजेसाठी वरदान

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’

‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा