ICC World Cup 2019 : …तर भारतही होऊ शकतो वर्ल्डकप स्पर्धेबाहेर

लंडन : वृत्तसंस्था – रविवारी इंग्लंविरुद्धचा सामना भारताने गमावल्यामुळे पाकिस्तानचा संघ जवळजवळ वर्ल्ड कप स्पर्धेबाहेर पडला आहे. मात्र भारताचीही स्थिती सध्या दोलायमान दिसत आहे. एकूण सात सामन्यांपैकी सलग ५ सामने भारतीय संघाने जिंकले होते मात्र भारताची ही विजयी घोडदौड इंग्लंडच्या संघाने रोखली. सेमीफायनलमध्ये आपले स्थान नक्की करण्यासाठी भारतीय संघाला अजून एका विजयाची गरज आहे.

इंग्लंडविरुद्धचा सामना भारतानं ३१ धावांनी गमावला. यानंतर गुणतालिकेत भारतीय संघ ११ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यातील पराभवामुळे रनरेटचा फरक भारताला जास्त पडला नाही मात्र आता उर्वरीत दोन सामन्यांपैकी किमान एक सामना भारताला जिंकावाच लागणार आहे. तसे न झाल्यास मात्र भारताचा सेमीफायनल मधील प्रवेश अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे.

या उर्वरीत दोन सामन्यांपैकी पहिला सामना मंगळवारी बांगलादेशविरोधात होईल. हा सामना भारत आणि बांगलादेश दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. कारण भारताने हा सामना जिंकला तर भारताचे सेमीफायलनमढील स्थान निश्चित होईल आणि बांगलादेश स्पर्धेबाहेर पडेल. मात्र हा सामना जर बांगलादेशने जिंकला तर पाकिस्तानसाठी सेमीफायनल गाठणे अशक्यप्राय होईल.

असे झाल्यास भारत वर्ल्ड कप स्पर्धेबाहेर :

बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्धचा असे दोन्ही सामने भारत हरला तर भारताचे गुण ११ राहतील. तर बांगलादेशचे गुण ९ होतील. श्रीलंका आज वेस्ट इंडिज विरोधात लढत असून विजयाच्या उंबरठ्यावर आहे. याशिवाय बुधवारी इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना असून हा सामना जर इंग्लंड संघानं जिंकला तर त्यांचे गुण १२ होतील आणि ते सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. मंगळवारी भारता-बांगलादेश सामना झाल्यानंतर बांगलादेशचा पुढचा सामना पाकिस्तान विरोधात होणार आहे. याही सामन्यात बांगलादेशनं विजय मिळवला तर त्यांचे ११ गुण होतील. तर, पाकिस्ताननं हा सामना जिंकला तर त्यांचे ११ गुण होतील. असे झाल्यास ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि पाकिस्तान किंवा बांगलादेश हे चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील आणि भारताचे आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

 

अनेक शारीरीक समस्या आणि आहाराबाबत आहेत ‘हे’ गैरसमज

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

दलित तरुणावर प्रेम करणाऱ्या आदिवासी युवतीला अमानुष मारहाण

उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकारच्या निर्णयावर बरसल्या मायावती