मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरही बनला ‘केन’चा चाहता ‘फॅन’ !

लंडन : वृत्तसंस्था – आयसीसीच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना हा डोळे रोखून ठेवावा असाच झाला. आधी टाय, मग सुपर ओव्हर आणि शेवटच्या बॉलवर झालेला खेळ हे सर्वच डोळे दिपवणारे होते. या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली खरी पण सर्वांच्या मनात न्यूझीलंडने घर केले आहे.

इंग्लंड संघापेक्षा सर्वात जास्त कौतुक झाले ते, न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन याचे. कारण, सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजूने लागला नसूनही विल्यमसनने आपल्या चेहऱ्यावर हास्य कायम ठेवले होते. त्याने पराभवही हसत आणि शांततेत स्विकारला होता. त्यामुळे त्याला ‘कॅप्टन सुपर कुल’चे नाव देण्यात आले आहे. केन या विश्वचषकाचा मालिकावीरही ठरला. त्यामुळे सोशल मीडियावर ‘कॅप्टन सुपरकुल’ हा हॅशटॅग ट्रेण्ड करत आहेत. केन ने त्याच्या हास्याने आणि खेळाने सर्वांच्या मनात स्थान मिळवले आहे.

केन चे चाहते भारतातही झाले आहेत. कारण जगाला आता कॅप्टन कुल धोनी नंतर कॅप्टन सुपर कुल मिळाला आहे. भारताचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरही केनचा चाहता झाला आहे. सचिननं आपल्या ट्विटमध्ये, केनचे कौतुक केले आहे. “केन विल्यमसननेदेखील मला प्रभावित केले. त्याने ज्या प्रकारचा खेळ करून दाखवला, ज्या प्रकारे तो मैदानावर वावरत होता आणि ज्या प्रकारे त्याने संघाचे नेतृत्व केले, त्या साऱ्या गोष्टी पाहून मी त्याच्या प्रेमात पडलो आहे”, अशा शब्दात सचिनने केन बद्दलची भावना व्यक्त केली आहे.

 


आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने