पाकिस्तानच्या पराभवानंतर सानिया मिर्झा म्हणाली, मी पाकिस्तान संघाची ‘आई’ नाही

मॅंचेस्टर : वृत्तसंस्था – वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना झाल्यानंतर आता ट्विटरवॉर रंगले आहे. भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याच्या आधीच्या दिवशी पाकिस्तानची टीम नाईट पार्टी सेली ब्रेट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या नाईट पार्टीला भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाही पती शोएब मलिक व मुलासोबत दिसली. यावरून पाकिस्तानची मॉडेल वीणा मलिक हिने सानिया मिर्झाला सुनावले आहे.

सानिया मिर्झावर निशाणा साधताना वीणा मलिक म्हणाली आहे की, ‘मला तुमच्यासोबत गेलेल्या मुलांची भीती वाटत आहे. तुम्ही शीशी नाईट क्लबमध्ये तुमच्या मुलांना घेऊन गेलात ? माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही ज्या क्लबमध्ये गेलात तिथं जंक फुड असतं, ते खेळाडूंसाठी योग्य आहे का ? तु स्वत: एक आई आणि खेळाडू आहे, तुला हे माहित पाहिजे. ‘

यावर सानिया मिर्झानेही तिला प्रत्युत्तर दिले आहे. ‘वीणा, मी माझ्या मुलाला तिकडे घेऊन गेले नव्हते. मी माझ्या कुटुंबियांसोबत कुठे जायचं आणि कुठे नाही, हा निर्णय आमचा आहे. मला माझ्या मुलाची तुमच्या सर्वांपेक्षा जास्त काळजी आहे. आणि दुसरे म्हणजे मी पाकिस्तानी क्रिकेट संघाची आई किंवा शिक्षिका नाही. अशी सणसणीत टीका तिने वीणा मलिकवर केली.

वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव करत विजयाची परंपरा कायम राखली आहे. या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव केला आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ७ सामने झाले आहेत या सर्व सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला आहे.

Loading...
You might also like