ICC World Cup 2019 : ‘या’ चार संघांना मिळणार सेमीफायनलचे तिकीट ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये जवळपास निम्याहून जास्त सामने पार पडले असून आता सर्व संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी आकडे जुळवत आहेत. प्रत्येक संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करत असून या स्पर्धेत आतापर्यंत पावसाने पाच सामने वाया घालवले असून यामुळे तगड्या संघांना याचा फटका सेमीफायनलचे गणित जुळवताना बसण्याची दाट शक्यता आहे.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रॉबीन राऊंड पध्दतीचा वापर होत असल्यामुळं प्रत्येक संघाचे ९ सामने होणार आहेत. यानंतर गुणतालिकेत पहिल्या चार क्रमांकावर असलेले संघ सेमीफायनल गाठतील. त्यामुळं आता सेमीफायन गाठणारे ते चार संघ कोणते असतील, याचे तर्क वितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे.

आतापर्यंत सर्वच संघानी जवळपास चार ते पाच सामने खेळले असल्याने आता या स्थितीत सेमीफायनलचे गणित मांडणे सोपे जाणार आहे. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश या संघांनी ५ सामने खेळले आहेत. तर अफगाणिस्तान, भारत आणि इंग्लंड या संघांनी ४ सामने खेळले आहेत. आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या सामन्यांच्या संख्येनुसार असणाऱ्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि भारत पहिल्या चार क्रमांकावर आहेत. त्यामुळे या संघाची संधी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.

दरम्यान, ९ जुलैपासून सेमीफायनल सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्याआधी हे चार संघ कोणते हे स्पष्ट होईलच मात्र पाठीराखे आपले आडाखे बांधत आहेत त्यामुळे सर्व साखळी सामने पार पडल्यानंतरच हे स्पष्ट होईल.

आरोग्यविषयक वृत्त –

#YogaDay2019 : उंची वाढविण्यासाठी करा ‘ताडासन’ 

“संधिवात” बरा करायचा असेल तर पाळा हे पथ्य 

बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’ ; ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’ साठी देखील फायदाच 

पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर ‘फळे’ खाण्यापूर्वी हे करा 

You might also like