दुखापतीनंतर गब्बर शिखर धवनची भावनिक पोस्ट ; म्हणाला, ‘हम हौसलों से उड़ते हैं’

लंडन : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झालेल्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे चर्चेत आलेला भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दुखापतीनंतर शिखर धवनने त्याच्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. शिखर धवनने ट्विटरवर शायरीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

धवनने , “कभी महक की तरह हम गुलों से उड़ते हैं, कभी धुएं की तरह पर्वतों से उड़ते हैं.. ये कैेचियाँ हमें उड़ने से खाक रोकेंगी, कि हम परों से नहीं हौसलों से उड़ते हैं…” ही शायरी पोस्ट केली. धवनने शायरीच्या शेवटी डॉ. राहत इंदौरी यांचा उल्लेख केला आहे. यावरून प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांची ही शायरी असल्याचे कळते.

वर्ल्डकपमध्ये झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला मात्र याच सामन्यात ११७ धावांची शतकी खेळून भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारा सलामीवीर शिखर धवन जखमी झाला. शिखर धवनच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली. यांमुळे पुढील काही आठवडे त्याला विश्रांती घ्यावी लागणार आहे. धवन आता वर्ल्डकप खेळू शकणार नाही असे देखील बोलले जात होते परंतु अखेर बीसीसीआयने वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली शिखरला भारतीय संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धवनला झाली होती दुखापत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात शिखर धवनच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. वेगवान गोलंदाज पॅट कमिंसच्या चेंडूंमुळे धवनच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली. या सामन्यात शिखर धवनने ११७ धावांची शानदार खेळी केली होती. धवनला तीन आठवड्याची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

धवनच्या जागी ऋषभ पंत

धवनला झालेल्या दुखापतीमुळे शिखर धवनला वर्ल्डकपमधील काही सामन्यात खेळता येणार नाही. त्याच्या जागी विकेटकिपर आणि २१ वर्षीय फलंदाज ऋषभ पंतला संधी दिली जाणार आहे. ऋषभ पंत इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.

शिखर धवन इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करणार

मेडिकल रिपोर्टनुसार शिखर धवन इंग्लंड विरोधात होणाऱ्या सामन्यात पुनरागमन करु शकतो. भारत आणि इंग्लंड यांच्यात ३० जून रोजी सामना होणार आहे. त्याआधी भारत २२ जून रोजी अफगाणिस्तान विरोधात खेळेल, या सामन्यातही शिखर खेळू शकतो. मात्र इंग्लंडविरोधात भारताला त्याची जास्त गरज असेल.