विश्वकप २०१९ : भारतीय संघाच्या भगव्या रंगाची जर्सीचे फोटो व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विश्वचषकाला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून चार दिवसातच या स्पर्धेत धक्कादायक निकाल समोर येत आहेत. या स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघात यंदाच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. या स्पर्धेत भारतीय संघ दोन रंगांच्या जर्सीमध्ये खेळताना दिसून येणार आहे. मेन इन ब्लू अशी ओळख असलेला भारतीय संघ या विश्वचषकात वेगळ्याच रंगाच्या जर्सीत खेळताना दिसून येणार आहे. भारतीय संघ निळ्या रंगाच्या जर्सीबरोबरच भगव्या रंगाच्या जर्सीत देखील खेळताना दिसून येणार आहे. जर्सीबाबत आयसीसीने यंदाच्या विश्वचषकासाठी फुटबॉलच्या धर्तीवर होम आणि अवे अशा नवा प्रस्ताव ठेवला आहे. या नियमानुसार यजमान संघ वगळता प्रत्येक संघ पर्यायी जर्सीमध्ये दिसणार आहे. सध्या भारतीय संघ निळ्या रंगाच्या आणि भगव्या रंगछटा असलेली जर्सी वापरात आहे.

दरम्यान, भारतीय संघ जी भगव्या रंगाची जर्सी वापरणार आहे, त्या जर्सीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या जर्सीचा हा फोटो व्हायरल होत असला तरी समोरील बाजूने ती कशी दिसणार आहे, यासंदर्भात कोणतेही फोटो समोर आलेले नाहीत. त्यामुळे नक्की कोणत्या डिझाईनची जर्सी भारतीय संघ घालणार हे गुलदस्त्यातच आहे.

का खेळणार वेगळ्या जर्सीत

विश्वचषकात भारत, इंग्लंड, अफगाणिस्तान , श्रीलंका या संघांची जर्सी निळ्या रंगाची आहे.जर्सीबाबत आयसीसीने यंदाच्या विश्वचषकासाठी फुटबॉलच्या धर्तीवर होम आणि अवे अशा नवा प्रस्ताव ठेवला आहे. या नियमानुसार यजमान संघ वगळता प्रत्येक संघ पर्यायी जर्सीमध्ये दिसणार आहे. त्यामुळे भारतीय संघ इंग्लंड आणि अफगाणिस्तानविरुद्ध भगव्या रंगाच्या जर्सीमध्ये आपल्याला खेळताना दिसून येतील. भारताप्रमाणेच बांगलादेश आणि पाकिस्तान यांना देखील आपल्या जर्सीमध्ये बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे भारतीय संघासाठी पर्यायी जर्सी म्हणून भगव्या रंगाची निवड करण्यात आली आहे.