ICC World Cup 2019 : ‘हिटमॅन’ रोहित शर्माकडे ‘कर्णधार’पद ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत सेमीफायनलमध्ये बाहेर पडलेला भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जात असून याआधी भारतीय संच कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्व गुणांवर आता शंका उपस्थित करण्यात येत आहेत. अनेक दिग्गजांनी त्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केलं आहेत. त्याच्या अनेक निर्णयांवर सर्वांनीच प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर आता विंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे दिले जाऊ शकते अशी माहिती मिळत आहे. या दौऱ्यात अनेक खेळाडूंना विश्रांती देखील दिली जाणार असल्याची शक्यता आहे.

फलंदाज म्हणून विराट कोहलीची कामगिरी जबरदस्त झाली मात्र कर्णधारपदाला साजेशी कामगिरी त्याला करता आली नाही. त्याचबरोबर रोहित शर्माने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत पाच शतकांसह ६४८ धावा केल्या.सेमीफायनलमध्ये मात्र त्याला हवे तसे यश मिळवता आले नाही. त्यामुळे सतत क्रिकेट खेळात असणाऱ्या कोहलीला विश्रांती देऊन रोहित शर्माकडे नेतृत्व दिले जाऊ शकते. भारतीय संघ या या वर्ल्डकप स्पर्धेनंतर वेस्टइंडीजच्या दौऱ्यावर असून भारतीय संघ या दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात धोनी खेळतो कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
१ ऑगस्टला भारतीय संघ या दौऱ्यासाठी विंडीजला रवाना होणार आहे.

दरम्यान, या दौऱ्यात भारतीय कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांच्यासह आणखी काही खेळाडूंना विश्रांती दिली जाणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या