‘हा’ माजी खेळाडू म्हणतो, भारताला हरवणे सोपे

लंडन : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास तीन सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने शानदार ३६ धावांनी विजय मिळवत आपला दुसरा विजय साजरा केला. त्यानंतर काल झालेला न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसाने वाया गेल्याने संघाचा विजय मिळण्याच्या मनसुब्यावर पाणी फिरल्याने भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे.

१६ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धेतील सामना रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ स्थानावर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हा सामना टक्करचा होणार आहे. त्यामुळे या सामन्याआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनिस त्यांच्या मदतीला धावून आला आहे. त्यानं भारताला पराभूत करण्यासाठीचा एक मंत्र पाकिस्तान संघाला सांगितला आहे.

वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तान संघाने भारतीय संघावर कधीही विजय मिळवलेला नाही. त्याने पाकिस्तानी संघाला मार्गदर्शन करताना सांगितले कि, भारतीय संघाला लवकर बाद करायचे असेल तर ऑस्ट्रेलियाविरोधात ज्याप्रकारे पाकिस्तानी गोलंदाजांनी गोलंदाजी केली, त्याचप्रकारची गोलंदाजी भारताविरोधात करावी.

दरम्यान, भारताविरोधात सलामीची जोडी फोडणे पाकिस्तानला गरजेचे आहे. मात्र मॅंचेस्टरमध्ये सकाळपासून-संध्याकाळपर्यंत पाऊस वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं चाहत्यांना मोठा फटका बसू शकतो.

yunis

आरोग्य विषयक वृत्त

जागतिक रक्तदान दिन : गरिबांचा कैवारी ‘अनिल लुणिया’

किहोल सर्जरी ‘ब्रेन ट्युमर’ काढण्यासाठी फायदेशीर

जाणून घ्या ‘केमोथेरेपी’ म्हणजे नेमकं काय ?