ICC नं घेतले महत्त्वाचे निर्णय ! वनडे-टी 20 विश्वचषक संघाच्या संख्येत वाढ, चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल झाला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2024 ते 2031 या 8 वर्षाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात ICC ने अनेक मोठे अन् महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यात टी-20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषकातील संघांची संख्या वाढवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीही नवीन पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. मंगळवारी (दि.1) झालेल्या बैठकीनंतर ICC ने पुढील 8 वर्षांच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यामुळे यंदा भारतात होत असलेल्या टी-20 विश्वचषकासाठीही बीसीसीआयला काहीसा दिलासा दिला आहे. आयसीसीने घेतलेले निर्णय हे क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी ठरणार आहेत.

ICC च्या फ्यूचर टूर्स प्रोग्रॅमनुसार 2024 ते 2031 या काळात 4 टी- 20 विश्वचषकाचे आयोजन केले जाणार असून यात 20 संघ सहभागी होतील. तसेच 2 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धाही घेण्यात येणार असून यात 14 संघ सहभागी होतील. यादरम्यान 2 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 4 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धांचेही आयोजन केले आहे. तसेच या दरम्यान होणा-या टी -20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 55 सामने होतील. तसेच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत प्रत्येकी 54 सामने होतील. पुरुषांच्या विश्वचषकात 7-7 संघाचे दोन गट राहणार आहेत. टॉप 3 संघ सुपरसिक्स फेरीत पोहोचतील. हा फॉर्मॅट 2003 च्या विश्वचषकात वापरला होता. तर टी-20 विश्वचषकात 5-5 संघाचे 4 गट असतील. अव्वल दोन संघ सुपर-8 मध्ये पोहोचतील. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरी होणार आहे. ICC ने बंद केलेली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2025 मध्ये आयोजित केली जाणार आहे.

त्यानंतर 2029 मध्ये या स्पर्धेचे पुन्हा आयोजन केले जाईल .आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2025, 2027, 2029 आणि 2031 मध्ये आयोजित होईल. तर महिलांच्या स्पर्धांचे वेळापत्रक आधीच जाहीर झालेले आहे. ICC च्या बोर्डाने सर्व पुरुष, महिला आणि 19 वर्षांखालील स्पर्धांच्या यजमानांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे. पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धांच्या यजमान देशांची निवड सप्टेंबरमध्ये होणार आहे. तर महिलांच्या स्पर्धा आणि टी- 20 स्पर्धांसाठीच्या यजमानाबाबतचा निर्णय नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार आहे.

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून