ICC कडून क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन जाहीर; भारताच्या ‘या’ खेळाडूला मिळाले नामांकन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ICC ने गुरुवारी पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर 2022 साठी नामांकन झालेल्या खेळाडुंची यादी जाहीर केली. या यादीमध्ये 4 जणांना स्थान देण्यात आले. यामध्ये एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे. तर उर्वरित तिघे हे झिम्बॉब्वे, इंग्लंड आणि पाकिस्तानचे आहेत. या खेळाडूचे नाव आहे सूर्यकुमार यादव. तसेच या यादीमध्ये सिकंदर रजा, सॅम करन आणि मोहम्मद रिजवान यांचा समावेश आहे.

सूर्यकुमार यादवने यंदाच्या वर्षी धुमाकूळ घातला आहे. त्याने 31 सामन्यात 46.56 च्या सरासरीने आणि 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1164 धावा काढल्या आहेत. तसेच टी20 क्रिकेटमध्ये त्याने 1 हजार धावांचा टप्पा ओलांडला असून असं करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

2022 या वर्षात इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटर सॅम करनने टी20 वर्ल्ड कपमध्ये मालिकावीरचा बहुमान पटकावला होता. तर फायनल सामन्यामध्ये तो सामनावीर ठरला होता. सॅम करनने या वर्षभरात 19 सामन्यात 25 विकेट घेतल्या. यापैकी 13 विकेट या टी20 वर्ल्ड कपमध्ये घेतल्या आहेत.

झिम्बॉब्वेचा सिकंदर रजा यादेखील या यादीमध्ये नामांकन मिळाले आहे.
त्याने यावर्षी 24 सामन्यात 735 धावांसह 25 विकेट घेतल्या आहेत. सिकंदर रजाला यावर्षी पहिल्यांदाच आयपीएलमध्ये संधी मिळाली आहे.
पंजाबच्या संघाने त्याला खरेदी केले आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानने सलग दुसऱ्या वर्षी जबरदस्त अशी कामगिरी केली.
त्याने मागच्या वर्षी 1326 धावा केल्या होत्या. तर यंदा त्याने 996 धावा केल्या आहेत.
केवळ 4 धावांमुळे सलग दुसऱ्या वर्षी 1 हजार धावा करण्याची कामगिरी हुकली. यामध्ये त्याने 10 अर्धशतके केली आहेत.

Web Title :- ICC | icc cricketer of the year for t20i suryakumar yadav nominate with 4 others

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shruti Haasan | श्रुती हासनने सिनेसृष्टी बद्दल केले ‘हे’ मोठे वक्तव्य; म्हणाली “मी कधीही दिखावा केला नाही…”

Uddhav Thackeray | त्यांची नजर वाईट आहे, त्यामुळे आरएसएसने काळजी घेण्याची गरज; मुख्यमंत्र्यांच्या आरएसएस कार्यालय भेटीवर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य…