क्रिकेटच्या विश्वात प्रचंड खळबळ ! बांगलादेशच्या ‘शाकिब अल हसन’वर 18 महिन्यासाठी बंदी ?

ढाका : वृत्तसंथा – बांगलादेशच्या भारत दौऱ्याच्या अगोदर एक मोठी बातमी बाहेर आली आहे. त्यामुळे सर्व बांगलादेश क्रिकेटमध्ये खळबळ उडू शकते. बांगाला देशातील वृत्तपत्र ‘समकाल’ ने दावा केला आहे की, ‘शाकिब अल हसन’वर आयसीसी दीड वर्षाची बंदी घालू शकते. वृत्तपत्राच्या दाव्यानुसार शाकिब अल हसनला एका बुकीने मॅच फिक्सिंगच्या बाबत संपर्क साधला होता. परंतु, त्याने त्याची माहिती आयसीसीला दिली नाही.

बांगला देशतील समकाल वृत्तपत्राच्या दाव्यानुसार शाकिब हसन ला दोन वर्षापूर्वी फिक्सिगची ऑफर मिळाली होती. मॅचच्या अगोदर एका बुकीने शाकिब अल हसनशी संपर्क साधला. प्रोटोकॉलनुसार शाकिबने ऑफर मिळाल्यावर आयसीसीशी संपर्क साधला पाहिजे होता. पण, त्याने संपर्क साधला नाही.
शाकिब हसनला फिक्सिंगची ऑफर मिळाली असल्याची खबर आयसीसीच्या अंट्री करप्शन युनिटला लागली. त्यांनी या मुद्द्यावर बांगला देशाच्या या ऑलराऊंडरशी संवाद साधला. त्या दौरान शाकिब अल हसनने आपली चुक मान्य केली. त्याने बुकीला गंभीरपणे घेतले नाही. यामुळे त्याने आयसीसीला सांगितले नाही.

आयसीसीने बांगला देश क्रिकेट बोर्डाला याची माहिती दिली आहे. आयसीसीने शाकिबला टीमबरोबरच्या प्रशिक्षणापासून दूर ठेवण्याचे आदेश दिले आहे. भारत दौऱ्याच्या अगोदर शाकिब अल हसन हा प्रॉक्टीसच्या एका टप्प्यात सहभागी होता.

भारत दौऱ्यावर शाकिब येऊ शकणार नाही ?
शाकिब हसनने वर्ल्ड कपमध्ये शानदार प्रदर्शन केले होते. त्यानंतर बांगला देश क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेटपटू यांच्या संघर्ष सुरु झाला आहे. शाकिबच्या नेतृत्वाखाली क्रिकेटर्सचे वेतन वाढविण्याच्या कारणावरुन खेळाडुंनी बंद पुकारला होता. त्यानंतर बोर्डाने जाहीरात देऊन शाकिबला नोटीस दिली होती. बोर्डाच्या प्रमुखाने शाकिबला भारत दौऱ्यावर तो न येण्याविषयी बोलले होते. आता असे वाटत आहे, बांगला देशाचा हा ऑलराऊंडर कदाचित संघाबरोबर भारतात न येण्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com