ICC Men’s T20 World Cup 2022 Schedule | T20 विश्वचषकातील संघ, वेळापत्रक ! पॉईंट्स सिस्टीम अन् नियम सर्वकाही एकाच ठिकाणी

पोलीसनामा ऑनलाईन : ICC Men’s T20 World Cup 2022 Schedule | ऑक्टोबरमध्ये T20 विश्वचषकाला (T-20 World Cup) सुरुवात होणार आहे. यंदाचा T20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) खेळवण्यात येणार आहे. मागच्या वर्षीचा T20 विश्वचषक कोरोनामुळे UAE आणि ओमानमध्ये खेळवण्यात आला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले होते.16 ऑक्टोबरपासून या वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. परंतु ‘सुपर-12’चे सामने 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. टीम इंडिया यंदाचा वर्ल्ड कप रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या वर्ल्ड कप मधील टीम इंडियाचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. (ICC Men’s T20 World Cup 2022 Schedule)

एकूण 16 संघ खेळणार

T20 विश्वचषक 2022 मध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. ही टूर्नामेंट एकूण तीन टप्प्यात खेळवली जाणार आहे. यामध्ये राऊंड 1, सुपर-12 आणि प्ले-ऑफ सामने असे तीन टप्पे असणार आहेत. यामधील 8 संघ सुपर-12 साठी थेट पात्र ठरले आहेत, तर उर्वरित 4 संघ पात्रता फेरी जिंकून आपले स्थान पक्के करणार आहेत. पात्रता फेरीत 4-4 संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये आपापल्या गटातील टॉप-2 संघ सुपर-12 टप्प्यात पोहोचतील. त्यानंतर सुपर-12 मध्ये 6-6 संघांचे दोन गट असतील, ज्यामध्ये त्यांच्या गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. तेथे प्लेऑफ ला सुरूवात होईल. त्यांच्यातून सर्वोत्तम दोन संघ फायनल खेळतील. (ICC Men’s T20 World Cup 2022 Schedule)

राउंड-1

ग्रुप A: श्रीलंका, यूएई, नेदरलँड्स, नामीबिया

ग्रुप B: आयरलँड, स्कॉटलंड, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज

सुपर-12

ग्रुप 1: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलंड, अफगानिस्तान, ग्रुप-A विजेता, ग्रुप-B उपविजेता

ग्रुप 2: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, ग्रुप-A उपविजेता, ग्रुप-B विजेता

T20 विश्वचषकासाठी पॉईंट सिस्टिम

T20 विश्वचषकासाठी पॉइंट्स टेबल सिस्टीमसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक संघाला विजयासाठी दोन गुण मिळतील आणि सामना बरोबरीत किंवा रद्द झाल्यास दोन्ही संघाला 1-1 गुण दिला जाईल. गटातील दोन संघांचे गुण समान असल्यास, त्यांचा नेट रन-रेट पाहून आणि त्यांचा आमने-सामने रेकॉर्ड पाहून निर्णय घेण्यात येईल.

7 मैदानांवर खेळवण्यात येणार सामने

T20 विश्वचषक 2022 मध्ये एकूण 45 सामने खेळवण्यात येणार आहेत. होबार्ट आणि गिलॉन्गमध्ये पात्रता फेरीचे सामने खेळवले जातील. तर सिडनी, मेलबर्न, पर्थ, अडलेड आणि ब्रिस्बेन येथे सुपर-12 स्टेजचे सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचे सामने अ‍ॅडलेड ओव्हल आणि सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहेत. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे.

T20 विश्वचषकातील भारताचे सामने

(India) भारत विरुद्ध पाकिस्तान : 23 ऑक्टोबर, दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न)

भारत विरुद्ध ग्रुप A उपविजेता : 27 ऑक्टोबर, दुपारी 12.30 वाजता (सिडनी)

(India) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 30 ऑक्टोबर, दुपारी 4.30 (पर्थ)

भारत विरुद्ध बांगलादेश : 2 नोव्हेंबर, दुपारी 1.30 वाजता (अ‍ॅडलेड)

(India) भारत विरुद्ध ग्रुप B विजेता : 6 नोव्हेंबर दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न)

कुठं पाहता येणार वर्ल्ड कप?

भारतातील T20 विश्वचषकाचे सामने स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर प्रसारित केले जाणार आहेत. तसेच हॉट स्टार आणि वेबसाइटवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे. या शिवाय दूरदर्शनवर भारताचे सर्व सामने, उपांत्य फेरी, अंतिम सामने प्रसारित केले जाणार आहेत.

T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग

राखीव खेळाडू

मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर

Web Title :- ICC Men’s T20 World Cup 2022 Schedule | t20-world-cup-2022-full-explainer-schedule-team-india-matches-all-teams-live-streaming-channels-points-system marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashish Shelar | खडसे-अमित शाह यांच्या भेटीवर आशिष शेलारांचे मोठे विधान, म्हणाले… (व्हिडिओ)

Breast Pain Before Period | मासिक पाळीपूर्वी स्तन दुखण्याचा त्रास होत असेल तर असू शकते ‘हे’ कारण, जाणून घ्या उपचार