पाकिस्तानी संघाचा ‘नमाज’ चालतो, मग धोनीने वापरलेले ‘बलिदानाचे चिन्ह’ का नाही ? ; पाकच्या लेखकाचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विश्वचषकात भारताने विजयी सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात रोहितची फलंदाजी आणि धोनीचे ग्लोव्हजवर अधिक चर्चा झाल्या. धोनीच्या ग्लोव्हजवर पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटचे सन्मानचिन्ह आहे. त्यावर आयसीसीने आक्षेप घेतला आहे. आयसीसीने धोनीला असे चिन्ह असलेले फोटो वापरू नयेत अशी, ताकीद दिली आहे. त्यावर पाकिस्तानी वंशाचे लेखक तारेक फतेह यांनी आक्षेप घेतला आहे. मैदानात पाकिस्तानी संघाचा नमाज चालतो तर धोनीने ग्लोव्हज घातल्यास त्यात चुकीचे काय असा सवाल उपस्थित केला आहे. फतेह यांनी तसं ट्विट केले आहे.

आयसीसीने भारतीय संघाचा यष्टीरक्षक लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीला त्याच्या ग्लोव्हजवरुन लष्कराचे सन्मानचिन्ह काढण्यास सांगितले आहे. धोनीने हे ग्लोव्हज वापरले पाहिजेत. या प्रकरणामध्ये बीसीसीआयने धोनीच्या पाठिशी उभं रहायला हवे. विश्वचषकामध्ये इस्लामिक पद्धतीनुसार दाढी मिशा चालतात. धोनीच्या ग्लोव्हजची कोणालाही अडचण नसावी, असं ट्वीट त्यांनी केले आहे.

तसंच त्यांनी पाकिस्तानी संघाचा एक जुना फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोत पाकिस्तानी संघ क्रिकेटच्या मैदानातच नमाज पठण करताना दिसत आहे. त्यावरूनही आयसीसीला पाकिस्तानी संघ मैदानात प्रार्थना (नमाज पठण) करतो याबद्दल काहीच आक्षेप नाही. या प्रार्थनेमध्ये ख्रिस्ती आणि ज्यू लोकांना कमी लेखले जाते. आयसीसीला फक्त धोनीने घातलेल्या ग्लोव्हजवरील बलिदान चिन्हाचं वावडं आहे, असं फतेह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एवढेच नाही तर अनेक नेटकऱ्यांनी या प्रकरणात धोनीची पाठराखण केली आहे. धोनीने आपल्या देशाच्या सैन्याप्रती दाखवलेले हे प्रेम असून त्यात काहीच चूक नाही, असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तसंच धोनीने तेच ग्लोव्हज वापरावेत असं धोनीला सांगण्यात येत आहे. तर ट्विटरवर #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डींगमध्ये आहे. त्यामुळे धोनी आणि बीसीसीआय यावर काय निर्णय घेते, हे पाहावे लागणार आहे.