ICC Player of the Month | न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉन्वेसह ‘या’ दोन भारतीयांना मिळाले नामांकन; पहा कोणाकोणाचा आहे समावेश

0
502
ICC Player of the Month | icc names shubman gill mohammed siraj and devon conway as player of the month for january
file photo

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ICC Player of the Month | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी दर महिन्याला त्या महिन्यातील कामगिरीच्या जोरावर खेळाडूंना एक पुरस्कार देत असते. मंगळवारी आयसीसीने जानेवारी 2023 साठी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकने जाहीर केली. या नामांकन यादीमध्ये 3 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. ज्यामध्ये 2 भारतीय आणि एका परदेशी खेळाडूचा समावेश आहे. भारताच्या शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना नामांकन जाहीर झाले आहे तर न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉन्वेला या यादीमध्ये स्थान देण्यात आले आहे. या तिन्ही खेळाडूंनी जानेवारी महिन्यात क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. (ICC Player of the Month)

 

1. डेव्हॉन कॉन्वे
न्यूझीलंडचा धडाकेबाज डेव्हॉन कॉन्वेने मागच्या वर्षीचा आपला फॉर्म कायम ठेवत यावर्षी दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर या महिन्यात न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील ठरला आहे. या कामगिरीच्या जोरावर त्याला हे नामांकन जाहीर करण्यात आले आहे.

 

2. शुबमन गिल
भारतीय संघाचा ओपनर बॅट्समन शुबमन गिलने त्याच्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. जानेवारी महिना त्याच्यासाठी खूप खास होता. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक करत त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. यानंतर गिलने टी-20 मध्येही शतक झळकावले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर आयसीसीच्या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले. (ICC Player of the Month)

 

3. मोहम्मद सिराज
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये मोहम्मद सिराजने टीम इंडियाची धुरा सांभाळली होती.
मोहम्मद सिराजसाठी जानेवारी महिना खूप खास ठरला. त्याने या महिन्यात आपल्या गोलंदाजीच्या जोरावर वनडेत नंबर 1 गोलंदाज होण्याचा मुकुट मिळवला.
तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 10 हून अधिक बळी घेतले.
त्याच्या या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर आयसीसीच्या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.

 

Web Title :- ICC Player of the Month | icc names shubman gill mohammed siraj and devon conway as player of the month for january

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vaidehi Parashurami | अखेर वैदेही परशुरामीने यशराज मुखाटे सोबतच्या नात्याविषयी केला मोठा खुलासा

Nia Sharma | अभिनेत्री निया शर्माच्या ग्लॅमरस अदानी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले; डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे खूपच बोल्ड

Sania Mirza | सानिया मिर्झाचा अबु धाबी ओपनमध्ये पराभव; पहिल्याच फेरीत पडली बाहेर