विराट पुन्हा नंबर वन

नवी दिल्ली :

भारताचा कर्णधार विराटने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. विराटने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर विराटने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. क्रमवारीतील अव्वल स्थान पटकावताना कोहलीने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथला पिछाडीवर टाकले आहे.

पहिल्या कसोटीमध्ये दमदार कामगिरी करत अव्वल स्थान मिळेवलेले दुसऱ्या कसोटीतील निराशजनक कामगिरीमुळे विराट कोहलीने अव्वल स्थान गमावले होते. तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने पहिल्या डावात ९७ आणि दुसऱ्या डावात १०३ धावांची खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला होता. विराट कोहलीने या कामगिरीच्या बळावर कसोटीमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.

[amazon_link asins=’B012WPFRE4,B07FMJ4BQ1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7c120dac-a6d6-11e8-8128-e7fe8ff1dd92′]
दुसऱ्या कसोटीतील केलेल्या २०० धावांच्या बळावर विराटने १८ गुणाची कमाई केली. १८ गुणासह विराट कोहलीच्या खात्यावर ९३७ गुण जमा झाले आहेत. स्मिथवर आयसीसीने एका वर्षांनी बंदी घातली आहे. त्यामुळे तो वर्षभर आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळू शकणार नाही. पण सध्याच्या घडीला तो ९२९ गुणांसह दुसऱ्या स्थानवर आहे.