ICC World Cup 2019 : ICCच्या नियमांवर माजी खेळाडूंची ‘आगडोंब’ ; म्हणाले, ‘क्रिकेटची ‘मस्करी’ चालली आहे ?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये काल सुपर ओव्हर देखील टाय झाल्यानंतर बाउंड्रीच्या आधारे इंग्लंडने विजय मिळवला. मात्र यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी आयसीसीच्या या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर या नियमांमध्ये बदल करण्याची देखी मागणी मोठ्या प्रमाणावर माजी खेळाडूंकडून करण्यात येत आहे.

बाउंड्रीच्या आधारे इंग्लंडला विजयी घोषित केल्यानंतर माजी खेळाडूंबरोबरच क्रीडा रसिकांनी देखील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरिस याने या सामन्यानंतर ट्विट करत लिहिले कि, खूप छान, आयसीसी फक्त आता एक मजा म्हणून शिल्लक आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले त्यामुळे तो खुश नव्हता.

त्याचबरोबर न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग याने देखील ट्विट करत म्हटले कि, हे निर्दयी आहे. त्यानंतर भारताचा माजी खेळाडू आणि विद्यमान खासदार गौतम गंभीर याने देखील ट्विट करत आयसीसीवर निशाणा साधला. त्याने ट्विटमध्ये म्हटले कि, हा कोणता नियम आहे. बाउंड्रीच्या आधारे संघाला विजयी घोषित केले जाते. हा सामना टाय करायला हवा होता. माजी खेळाडूंबरोबरच सामान्य क्रिकेट रसिकांनी देखील या नियमांवर मोठ्या प्रमाणात टीका केली. एका फॅन्सने लिहिले कि, १०२ षटकानंतर देखील जर बाउंड्रीच्या आधारे विजेता संघ ठरणार असेल तर काय फायदा. तर अनेक जणांनी यावर आयसीसीला खडे बोल सुनावले आहेत.

हा आहे आयसीसीचा नियम –

आयसीसीच्या नवीन नियमांनुसार जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळून त्या सामन्याचा निकाल काढला जातो. मात्र त्यानंतर सुपर ओव्हर देखील टाय झाली तर ज्या संघाने सर्वात जास्त चौकार आणि षटकार मारले आहेत त्या संघाला विजयी घोषित करण्यात येते. त्याच आधारे काल झालेल्या फायनल सामन्यात इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. इंग्लंडने आपल्या डावात एकूण २६ बाउंड्री मारल्या होत्या तर न्यूझीलंडने केवळ १७ यामुळे या गणिताच्या आधारे इंग्लंड विजय झाला.

 सावधान ! साबण आणि टूथपेस्ट ने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

 जिरे-आल्या चा रस प्या ! १० दिवसात पोट कमी करा

 कॅन्सर च्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

 डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे

 खुशखबर ! १००० हून अधिक ‘औषध -गोळ्या’ होणार स्वस्त

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या