क्रीडाताज्या बातम्या

ICC T-20 Ranking | आयसीसीकडून टी- 20 रॅकिंग जाहीर ! पाकिस्तानचा दबदबा तर भारतीय खेळाडूंना फटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकत्याच पार पडलेल्या टी20 वर्ल्डकपनंतर (T20 World Cup) आयसीसीने (ICC) नवीन टी20 रॅकिंग (ICC T-20 Ranking) जाहीर केली आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये धावा करणाऱ्या फलंदाजांना त्याचा फायदा होऊन ते रॅकिंगमध्ये (ICC T-20 Ranking) अग्रस्थानी पोहोचले आहेत तर या नवीन रॅकिंगमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल तीन फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

या रॅकिंगमध्ये (ICC T-20 Ranking) पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) 839 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडचा डेव्हिड मलान (David Malan) दुसऱ्या तर एडन मार्कराम (Aiden Markram) तिसऱ्या स्थानावर आहे कायम आहेत. न्यूझीलंडचा विकेटकीपर फलंदाज डेव्हॉन कॉनवे (Devon Conway) हा तीन स्थानांची झेप घेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. डेव्हॉन कॉनवेने उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेल्या खेळीने न्यूझीलंडला विजय मिळवून दिला होता.

 

पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) पाचव्या स्थानावर आहे.
रिझवानने आताच्या विश्वचषकात 6 सामन्यात 70.25 च्या सरासरीने 281 धावा केल्या होत्या आणि एकदा तो सामनावीरसुद्धा ठरला होता.
ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) हा या वर्ल्डकपमध्ये विशेष काही करू शकला
नाही म्हणून त्याची चौथ्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्या 5मध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही आहे.

 

Web Title :- ICC T-20 Ranking | ICC announces T20 rankings Pakistan’s dominance hits Indian players

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Anti-Corruption Bureau Sangli | 1 लाख 26 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी माळशिरसच्या मुख्याधिकाऱ्यावर अ‍ॅन्टी करप्शनकडून FIR

Sinhagad Road Flyover | सिंहगड रोड अन् कात्रज येथील उड्डाणपुलांबाबत नितीन गडकरींनी केलेली सुचना ‘वास्तवात’ येण्याची शक्यता अगदीच धूसर

Smriti Mandhana | स्मृती मंधानाने रचला इतिहास ! BBL मध्ये शतक करणारी ठरली पहिली भारतीय, 64 बॉलमध्ये नाबाद 114 रन

Back to top button