Advt.

ICC T20 Rankings | बाबर आझम अव्वल स्थानी तर कोहली टॉप 10 मधून OUT

पोलीसनामा ऑनलाईन टीम ICC T20 Rankings | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये (ICC T20 Rankings) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि लोकेश राहुल (KL Rahul) यांची आपल्या स्थानात सुधारणा झाली आहे. तर विराट कोहलीच्या (Virat Kohli) स्थानामध्ये घसरण झाली आहे. तो टॉप टेन मधून बाहेर गेला आहे. रोहित शर्माने 15 व्या स्थानावरून 13 व्या स्थानावर झेप घेतली आहे. फलंदाजांच्या टॉप टेनच्या यादीत लोकेश राहुल (Lokesh Rahul) हा एकमेव भारतीय असून तो 729 गुणांसह पाचव्या स्थानावर पोहचला आहे.

फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) पहिल्या स्थानी पोहोचला आहे तर इंग्लंडचा डेविड मलान (Dawid Malan) 805 अंकासह दुसऱ्या,
दक्षिण आफ्रिकेचा एडम मार्करम (Aiden Markram) 796 रेटिंगसह तिसऱ्या तर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) 735 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

 

ऑस्ट्रेलियाचा (Australia) कर्णधार एरॉन फिंच (Aaron Finch) याला एका स्थानाचा फायदा झाला असून तो 709 अंकासह सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
तर न्यूझीलंडच्या ड्वेन कॉन्वे तीन (Devon Conway) स्थानांच्या घसरणीसह सातव्या स्थानावर पोहचला आहे.
यांच्यानंतर आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानी अनुक्रमे जोस बटलर (Jos Buttler) 674,
रस्सी व्हॅन डर डुसेन (Rassie van der Dussen) 669,
आणि मार्टिन गप्टिल (Martin Guptill) 658 यांचा नंबर लागतो. (ICC T20 Rankings)

 

Web Title : ICC T20 Rankings | ICC Men’s T20I Player Rankings PAK Babar Azam tops while Virat Kohli OUT from top 10

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Health Department | सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘या’ उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षा होणार

Aarya-2 Motion Poster | ‘आर्या 2’चं मोशन पोस्टर रिलीज, सुस्मिता सेनचं क्रूर रूप पाहून तुम्हीही व्हाल थक्क..!

Sachin Waze | सचिन वाझेची उलटतपासणी; अनिल देशमुखांबद्दल वाझे जबाबात म्हणाला…