ICC T20 World Cup | T-20 वर्ल्ड कपचा थरार UAE सह ‘या’ देशात रंगणार; ICC ने जाहीर केल्या तारखा

पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  क्रिकेटप्रेमीसाठी मोठी बातमी आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी ट्वेंटी- 20 वर्ल्ड कप स्पर्धा भारताऐवजी (ICC T20 World Cup) (UAE) यूएईमध्ये खेळविण्याची मोठी घोषणा मंगळवारी (दि. 29) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) केली आहे. ट्वेंटी- 20 वर्ल्ड कप संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याची अधिकृत घोषणा आयसीसीने केली आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क बीसीसीआयकडेच ( BCCI) राहणार असल्याचे आयसीसीने (ICC) स्पष्ट केले आहे. icc confirmed uae and oman will host t20 world cup 2021 during 17th october 14th november

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायेद स्टेडियम, अबु धाबी, शाहजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी ग्राऊंडवर होणार आहेत.
8 पात्र संघांत होणाऱ्या पहिल्या फेरीचे सामने ओमान (Oman) आणि युएई (UAE) येथे होतील.
यातून चार संघ सुपर 12 साठी पात्र ठरवले जातील.

ICC T20 World Cup

बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान, पपुआ न्यू गिनी यापैकी चार संघ सुपर 12 मध्ये प्रवेशासाठी खेळतील.
आयसीसी क्रमवारीत अव्वल 8 क्रमांकावर असलेले संघ आधीच सुपर 12 साठी पात्र ठरलेले आहेत.
सुपर 12 मध्ये 30 सामने होतील आणि 24 ऑक्टोबरला या सामन्यांची सुरुवात होईल.
सुपर 12 संघांची दोन गटांत विभागणी केली जाईल आणि त्यांचे सामने दुबई, अबु धाबी आणि शाहजाह या तीन मैदानावर होतील.
त्यानंतर 3 प्ले ऑफ सामने, 2 सेमी फायनल व एक फायनल अशी स्पर्धा पुढे सरकरणार आहे.
2016 साली वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडला नमवून ट्वेंटी-20 वर्ल्ड कप उंचावला होता,
त्यानंतर होणारी ही पहिलीच ट्वेंटी- 20 वर्ल्ड कप स्पर्धा आहे.

Web Title : icc confirmed uae and oman will host t20 world cup 2021 during 17th october 14th november

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LPG Gas Cylinder | गॅस सिलेंडर बुक करा अन् 900 रुपयांपर्यंतची Cashback मिळवा, जाणून घ्या कशी मिळवाल ‘ही’ ऑफर