ICC T20I Rankings | ICC क्रमवारीनुसार सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी कायम; इतिहास रचण्यापासून काही पावलं दूर

पोलीसनामा ऑनलाईन : ICC T20I Rankings | भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने ICC T20 इंटरनॅशनल क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीनुसार सूर्याने अव्वल स्थानी झेप घेतली आहे मात्र त्याच्या रेटिंग पॉईंटमध्ये घसरण झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंड विरुद्ध T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात, सूर्यकुमार यादवनं 47 धावांची खेळी खेळून आपल्या क्रमवारीत 910 रेटिंग गुण मिळवलं होते, हे रॅकिंग सूर्याच्या आतापर्यंतच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोत्तम रॅकिंग आहे. (ICC T20I Rankings)

मात्र न्यूझीलंड विरुद्धच्या लखनऊ येथील दुसऱ्या टी-20 सामन्यानंतर सूर्याच्या रेटिंगमध्ये काहीशी घसरण झाली.
त्याचं रेटिंग 910 वरून 908 वर आले. रेटिंग पॉईंट जरी कमी झाले असले तरी सूर्यकुमार भारतीय संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयसीसीचा सर्वोच्च रँकिंगचा फलंदाज बनला आहे.
2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरी करत सूर्याने ICC क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. सूर्याशिवाय मोहम्मद सिराज ODI ICC क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे.
ICC ने जाहीर केलेल्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत शुभमन गिल सहाव्या,
विराट कोहली सातव्या आणि रोहित शर्मा नवव्या स्थानावर आहेत. तर ऑलराउंडर खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. (ICC T20I Rankings)

इतिहास रचण्यापासून फक्त काही पावलं दूर

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात इंग्लडचा फलंदाज डेव्हिड मलानने ICC क्रमवारीत
सर्वाधिक 915 रेटिंग मिळवलं आहे. मलाननं 2020 मध्ये हे रेटिंग मिळवलं होतं.
तेव्हापासून आतापर्यंत मलानच्या रेटिंगची बरोबरी कोणत्याच खेळाडूला करता आलेली नाही.
आता सूर्याचं लक्ष मलानचा रेकॉर्ड मोडण्यावर असणार आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 च्या इतिहासात आयसीसी क्रमवारीत सर्वाधिक रेटिंग मिळवणारा सूर्यकुमार यादव दुसरा फलंदाज ठरला आहे.

Web Title :- ICC T20I Rankings | indian star batsman suryakumar yadav remains at top of icc mens t20i rankings know latest ranking

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra MLC Election Results | ‘सत्यजीत तांबे जिंकले तरीही तो भाजपचा विजय नसेल…;’ – जयंत पाटील

Pune Crime News | ‘आरोपी पकडा अन् बक्षीस मिळवा’, कोयता गँगच्या दहशतीमुळे पुणे पोलिसांची अनोखी योजना

Maharashtra MLC Election Results | सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार नाहीत…; मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले कारण