टीम इंडिायाचा कॅप्टन विराट कोहलीला मिळाली वर्षाअखेरीस ‘Good News’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली वेस्टी इंडिजविरुद्ध ट्वेंटी 20 मालिकेत आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज आहे. विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी धमाकेदार कामगिरी करायची आहे. 2019 मधील अखेरीची मालिका अविस्मरणीय करण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. नुकतीच क्रिकेटमधुन काही काळ विश्रांती घेत त्यानं वेळ घालवला आहे. अशातच आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला वर्षाअखेरीस गुडन्यूज मिळाली आहे. आयसीसी कसोटी फलंदाजाच्या यादीत विराटनं अव्वल स्थान पटकावलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णाधार स्टीव्ह स्मिथ फलंदाजांच्या क्रमावारीत अव्वल स्थानावर होता. परंतु पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला साजेशी कामगिरी करायला जमलं नाही. दक्षिण आफ्रिकेवरविरुद्ध मालिकेतील द्विशतकी खेळीनंतर विराट कोहलीनं बांग्लादेशविरुद्धही शतक झळकावलं. या मालिकांपूर्वी दोघांच्या गुणांमध्ये अवघ्या 3 गुणांचा फरक होता. पाकिस्तानविरुद्ध अपयश मिळाल्यानं स्मिथची क्रमावारी घसरली. स्मिथ 931 गुणांवरून 923 गुणांवर आला. कोहलीच्या खात्यात असणारे 928 गुण मात्र कायम राहिले. त्यामुळे वर्षाअखेरीस कोहलीनं कसोटी फलंदाजांत अव्वल स्थान पटकावलं.

फलंदाजांच्या यादातील अव्वल 10 मध्ये भारताचा चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचाही समावेश आहे. पुजारा 791 गुणांसह 4 व्या क्रमांकावर दिसत आहे. तर अजिंक्य (759) मात्र घसरण होऊन 6 व्या क्रमांकावर गेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हीड वॉर्नरनं पाकिस्तानविरुद्ध त्रिशतकी खेळी करत थेट 5 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. वॉर्नरनं थेट 12 स्थानांची सुधारणा केली आहे.

गोलंदाजांच्या अव्वल 10 बद्दल बोलायचं झालं तर भारताचा जसप्रीत बुमराह, अश्विन (9) आणि मोहम्मद शमी आहे जो 10 व्या स्थानावर आहे. बुमराह 5व्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा (839), ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स (900), न्युझिलंडचा नेल वॅगनर (814), वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर (830) आणि भारताचा बुमराह हे अव्वल 5 मध्ये आहेत.

अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर जेसन होल्डर (473), अव्वल स्थानी कायम आहे. तर रवींद्र जडेजा (406) आणि अश्विन (308) यांनी अनुक्रमे दुसरे आणि पाचवे स्थान कायम राखले आहे.