रँकिंगमध्ये टीम इंडिया जिंकली ! मात्र, विराटला बसला मोठा ‘धक्का’

जमैका : वृत्तसंस्था – भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची टी-२०, एकदिवसीय मालिकेनंतर कसोटी मालिकाही जिंकली आहे. भारताची टीम रँकिंगमध्ये अव्वल असली तरी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची आयसीसी कसोटी क्रमवारीत घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथने चांगली कामगिरी करत विराटचे अव्वल स्थान हिसकावले आहे. आयसीसी क्रमवारीत 904 गुणांसह ऑस्ट्रेलियाचा स्मिथ अव्वल तर 903 गुणांसह विराट दुसऱ्या स्थानावर आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा 28 वा विजय आहे. त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 27 कसोटी जिंकल्या आहेत. परदेशामध्ये सर्वाधीक कसोटी सामने जिंकण्यामध्ये विराट कोहलीचा पहिला क्रमांक आहे. मात्र, या सगळ्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या विराट कोहलीचे अव्वल स्थान गेल्याने एक मोठा धक्का बसला आहे. संघाने चांगली कामगिरी केली असली तरी कोहलीला चांगली कामगिरी करता आली नाही. विराटची जागा आता ऑस्ट्रेलियाच्या स्मिथने घेतली आहे.

स्मिथने कसोटीमध्ये पुनरागमन करताना अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात शतक झळकावलं. तर दुसऱ्या कसोटीमध्ये जखमी झाल्यानंतर देखील त्याने 92 धावांची खेळी केली होती. दोन शतकी आणि एक अर्धशकतकी खेळाच्या जोरावर स्मिथने अव्वल स्थान पटकावले आहे. तर विराट कोहलीने वेस्ट इंडिजबरोबरच्या चार डावात फलंदाजी करताना फक्त दोन अर्धशतकं झळकावता आली.

आरोग्यविषयक वृत्त –

तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे

शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या

देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी

नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार

काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत

कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्‍या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर