ICC Tournaments Schedule | भारत दोन वर्ल्ड अन् चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे करणार आयोजन, ICCची मोठी घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  ICC Tournaments Schedule | आयसीसीने (ICC)आज 2024 ते 2031 या कालावधीमध्ये होणाऱ्या 8 नव्या स्पर्धांची घोषणा नुकतीच केली आहे. चार वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) स्पर्धेचे पुनरागमन होणार आहे आणि पाकिस्तानला (Pakistan) 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळाले आहे. या कालावधीत सहा वर्ल्ड कप व दोन चॅम्पिन्स ट्रॉफी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. (ICC Tournaments Schedule)

 

भारत आणि पाकिस्तान बरोबर अमेरिका, झिम्बाब्वे, नामिबिया, आयर्लंड आणि स्कॉटलंड या संघांनाही आयसीसीच्या स्पर्धा आयोजनाचा मान मिळाला आहे. भारतानं 2011मध्ये संयुक्तपणे वन डे वर्ल्ड कप      (One Day World Cup)स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानंतर आता भारत 2026 व 2031 मध्ये अनुक्रमे T-20 व वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करणार आहे. (ICC Tournaments Schedule)

 

पाकिस्तानला जवळजवळ 29 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. या अगोदर 1996मध्ये भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले होते. आयसीसीच्या या निर्णयामुळे आनंद झाल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) अध्यक्ष रमिझ राजा (Ramiz Raja) यांनी म्हंटले आहे.

 

जाणून घ्या वर्ल्ड कपचे संपूर्ण वेळापत्रक

 

2024 T-20 वर्ल्ड कप – वेस्ट इंडिज आणि अमेरिका

2025 चॅम्पियन्स ट्रॉफी – पाकिस्तान

2026 T-20 वर्ल्ड कप – भारत आणि श्रीलंका

2027 वन डे वर्ल्ड कप – दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया

2028 T-20 वर्ल्ड कप – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

2029 चॅम्पियन्स ट्रॉफी – भारत

2030 T-20 वर्ल्ड कप – इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड

2031 वन डे वर्ल्ड कप – भारत आणि बांगलादेश

 

Web Title : ICC Tournaments Schedule | india will be hosting 2026 wt20 sl 2029 champions trophy 2031 world cup bangladesh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Michael Vaughan | भारताला नावं ठेवणाऱ्या क्रिकेटरला ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूने झापले

Pune News | पुण्यातील पत्रकार राजेंद्र येवलेकर यांचे निधन

Reserve Bank Of India | रिझर्व्ह बँकेने 100 पेक्षा जास्त अनावश्यक सर्क्युलर माघारी घेतले