ICC Under-19 Cricket World Cup | …म्हणून न्यूझीलंडची पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार; NZ ऐवजी ‘ही’ टीम सहभागी होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ICC Under-19 Cricket World Cup | आयसीसीनं (ICC) आगामी काळात होणाऱ्या स्पर्धांच्या तारखा काही दिवसांपूर्वी जाहीर केल्या. यापैकी 3 स्पर्धा भारतामध्ये होणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेवर लक्ष ठेवून 2024 साली होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं संयुक्त यजमानपद अमेरिकेला (America) देण्यात आलं आहे. आयसीसीनं बुधवारी पुढील वर्षी वेस्टइंडिजमध्ये (West Indies) होणाऱ्या अंडर 19 वर्ल्ड कप (ICC Under-19 Cricket World Cup) स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र हे वेळापत्रक जाहीर होताच न्यूझीलंडनं (New Zealand) या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

 

न्यूझीलंडनं हा निर्णय देशातील अल्पवयीन नागरिकांना स्पर्धेतून परत आल्यानंतर पाळाव्या लागणाऱ्या अनिवार्य क्वारंटाईन (Quarantine) नियमांमुळे घेतला आहे. न्यूझीलंडच्या जागी स्कॉटलंडचा (Scotland) 16 वी टीम म्हणून स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. आयर्लंडला (Ireland) या वर्ल्ड कपसाठी पात्र होण्यात अपयश आलं होतं. 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान वेस्ट इंडिजमधील 10 वेगवेगळ्या ठिकाणी ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील स्पर्धेने या वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे.

अंडर-19 वर्ल्ड कपला 1988 पासून सुरुवात झाली आहे.
आतापर्यंत 13 वेळा हि स्पर्धा खेळवण्यात आली. त्यामध्ये भारताने सर्वाधिक 4 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.
ऑस्ट्रेलियाला 3, पाकिस्तानला 2 तर बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडला प्रत्येकी 1-1 वेळा विजय मिळवता आला आहे.
2020 साली झालेल्या अखेरच्या अंडर-19 वर्ल्ड कप (ICC Under-19 Cricket World Cup)फायनलमध्ये बांगलादेशने भारताचा पराभव केला होता.
भारताने 2000 साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वात, 2008 साली विराट कोहली, 2012 साली उन्मुक्त चंद आणि 2018 साली पृथ्वी शॉच्या नेतृत्वात अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता.

 

Web Title :- ICC Under-19 Cricket World Cup | ICC under 19 world cup 2022 new zealand withdraw from the tournament due to quarantine restrictions for minors New Zealand was replaced by Scotland as the 16th team in the tournament

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | 25 लाखांच्या लॉटरीसाठी गमावले 46 लाख ! सायबर चोरट्यांनी घातला तरुणाला गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना

Atal Pension Yojana | मोदी सरकारची ‘ही’ स्कीम पती-पत्नीसाठी ‘फिक्स्ड इन्कम’चे माध्यम, दरमहिना मिळतील रू. 10,000; जाणून घ्या कसे?

IND vs NZ | 17 नोव्हेंबर, 17 नंबरची जर्सी, 17 चेंडूवर 17 धावा, 2017 मध्ये पदार्पण; तुम्हाला माहित आहे का Love 17 असलेल्या खेळाडूचे नाव

Belly and Waist Fat | महिनाभरात एकाचवेळी कमी होईल पोट आणि कंबरेची चरबी, केवळ ‘हे’ 3 व्यायाम नियमित करा; जाणून घ्या