महिला टी-20 वर्ल्डकप : ‘या’ 4 संघांचे उपांत्य फेरीत स्थान ‘निश्चित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळणारे चार संघ निश्चित झाले आहेत. भारत आणि यजमान ऑस्ट्रेलियासह चार संघांना उपांत्या फेरीचे तिकीट मिळाले आहे. मात्र, कोणता संघ कोणत्या संघासोबत खेळणार हे स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे.

महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्या फेरीत प्रवेश करणारा पहिला भारतीय संघ आहे. भारतीय संघाने 27 फेब्रुवारीला न्यूझीलंडचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर 1 मार्चला दक्षिण अफ्रिका संघाने अंतिम चारमध्ये आपले स्थान पक्के केले. तर इंग्लंड संघानेही त्याच दिवशी उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले.

अंतिम चारमध्ये स्थान पटकवण्यासाठी आज (दि.2) न्यूझिलंड आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये लढत होती. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम चारमध्ये पोहचणार होता. आज झालेल्या दोन्ही संघामध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड संघाचा 4 धावांनी पराभव करत अंतिम चारमध्ये आपले स्थान पक्के केले. महिला टी-20 वर्ल्डकप उपांत्या फेरीतील चार संघ निश्चित झाले असून त्यांच्यामध्ये अंतिम सामन्यासाठी लढत होणार आहे.

उपांत्या सामन्यामध्ये ग्रुप ए मधील टॉपर असलेला भारतीय संघ ग्रप बीच्या दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघासोबत खेळणार आहे. तर ग्रुप ए मधील दुसरा संघ असलेला ऑस्ट्रेलिया ग्रुप बीच्या पहिल्या स्थानवर असलेल्या संघासोबत खेळणार आहे. मात्र, अखेरच्या साखळी सामना दक्षिण अफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन संघात होणार आहे. या सामन्यानंतर भारत कोणत्या संघाबरोबर उपांत्य फेरीत खेळणार हे निश्चित होणार आहे.

उपांत्या फेरीतील सामने
5 मार्चला पहिला उपांत्या फेरीचा सामना खेळवण्यात येणार आहे. यामध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिका किंवा इंग्लंड या दोन संघापैकी एका सोबत होणार आहे.

5 मार्चलाच दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळवण्यात येणार आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया या दोन संघापैकी एका सोबत होणार आहे.