ICC Women’s T20 World Cup : 4 वेळा विजेते ठरणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी भारताचा संघ भिडणार, जाणून घ्या कधी आणि कुठं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे व्यत्य आला, त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. आता हा सामना रद्द करण्यात आल्यानंतर अ गटातील अव्वल संघ म्हणून भारतीय संघाचा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित झाला. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेला 5 धावांनी पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. त्यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया टी – 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एकमेकांविरोधात मैदानात उतरतील.

विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात देखील भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ भिडले होते. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघाचा 17 धावांनी पराभव केला होता. यानंतर विश्वचषकाचा अंतिम सामना पुन्हा एकदा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा रंगणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया भारतावर विजय मिळवून पराभवाचा वचपा काढणार की भारत आपले वर्चस्व काम राखत विश्वचषकावर आपले नाव कोरणार हे सामन्यावेळीच कळेल.

विश्वचषकाचा हा अंतिम सामना 8 मार्चला भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता मेलबर्नला खेळवण्यात येईल.

अ गटातील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. इंग्लंडला बसलेल्या या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघात देखील तशीच धाकधुक होती. कारण दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्धच्या उपांत्य फेरीत देखील पावसाने खोडा घातला असता तर ऑस्ट्रेलियाला देखील आपला गाशा गुंडाळावा लागला असता परंतु पावसाने विश्रांती घेतल्याने ऑस्ट्रेलियाला प्रतिकुल वातावरण निर्माण झाले आणि ऑस्ट्रेलियाने 20 षटक खेळून काढल्यानंतर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली, त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर दक्षिण अफ्रिकेसमोर डकवर्थ लुईसनुसार 13 षटकात 98 धावांचे सुरक्षित लक्ष्य ठेवण्यात आले होते परंतु दक्षिण आफ्रिकेला 13 षटकात 5 बाद 92 धावा करता आल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाचा जीव भांड्यात पडला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात 5 धावांनी विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून त्यांच्या नावावर सर्वाधिक 4 जेतेपद आहेत. तर भारत पहिल्यांदाच विश्वचषकावर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज आहे.