ICC World Cup 2019 : भारत-श्रीलंका सामन्याआधी आकाशात दिसला ‘जस्टिस फॉर काश्मीर’चा बॅनर ; BCCI ची तिखट प्रतिक्रिया

लंडन : वृत्तसंस्था – ICC वर्ल्डकप २०१९ मध्ये भारत व श्रीलंकेच्या सामन्याआधी आता एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. लंडनमध्ये भारत श्रीलंका सामना सुरु होण्याआधी एक अनोळखी विमान ‘जस्टिस फॉर कश्मीर’ या बॅनरसह उडताना दिसून आले. या घटनेवर बीसीसीआयने तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बीसीआयने म्हंटले की, पहिल्यांदा धोनीच्या बलिदान बैजवर पाकिस्तानकडून आक्षेप घेण्यात आला आणि आता जस्टीस फॉर काश्मीर असे बॅनर आकाशात फडकावले आहेत. ICC ने पाकिस्तानवर बंदी घातली पाहिजे.

ICC ने ही घटना गांभीर्याने घेऊन म्हंटले की, राजकीय आणि अशाप्रकारचा विरोध कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. दरम्यान, लीड्स स्टेडियम उत्तर इंग्लंडच्या यॉर्कशायर भागात आहे आणि पाकिस्तानी नागरिकांची संख्या या ठिकाणी जास्त आहे. ICC च्या सुरक्षा समितीने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

गेल्या १० दिवसांतील अशाप्रकारची ही दुसरी घटना आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सामन्यादरम्यान ‘जस्टिस फॉर बलोचिस्तान’ या बॅनरचे विमान स्टेडियम जवळून उडताना दिसले. या बॅनरमुळे पाकिस्तानी व अफगाणिस्तानी प्रेक्षकांत गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेनंतर ICC ने प्रतिक्रिया देताना म्हंटले की, कोणत्याही परिस्थितीत अशाप्रकरच्या घटना येथून पुढे होऊ दिल्या जाणार नाहीत.

सिनेजगत बातम्या

हनीमूनवर ‘इंटिमेट’ झाले न्यू मॅरीड कपल ‘चारु आणि राजीव’, रोमॅटिंक अंदाजात केले ‘लिप लॉक’

व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टीने मागितला राज कुंद्राला ‘किस’

‘या’ चित्रपटात अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेत्री ‘कंगना रणौत’ !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री