ICC World Cup 2019 : रोहित शर्मा मोडणार महेंद्रसिंग धोनीचा ‘हा’ रेकॉर्ड !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास पाच सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने शानदार ८९ धावांनी विजय मिळवत आपला तिसरा विजय साजरा केला. वर्ल्ड कप २०१९ मधील गुणतालिकेत १० पॉईंट्ससह ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नऊ – आठ पॉईंट्स मिळवत न्यूझीलंड आणि इंग्लंड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे. रविवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघ आज अफगाणिस्तान विरुद्ध सामना खेळणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात अनेक नवीन विक्रम करण्याची संधी भारतीय खेळाडूंकडे आहे. या स्पर्धेत दमदार फॉर्ममध्ये असलेल्या हिटमॅन रोहित शर्माकडे आज भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

आतापर्यंत स्पर्धेत झालेल्या चार सामन्यांत रोहितने २ शतक आणि एका अर्धशतकाच्या साहाय्याने ३१९ धावा केल्या असून या स्पर्धेत तो भारतीय संघासाठी हुकुमी एक्का ठरत आहे. या सामन्यात त्याला धोनीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. एकदिवसीय सामन्यांत सर्वात जास्त षटकार मारण्याची संधी त्याच्याकडे आहे. भारताकडून सर्वात जास्त षटकार मारण्याच्या विक्रमापासून तो केवळ दोन षटकार दूर आहे. महेंद्रसिंग धोनी याने २९२ डावांमध्ये आतापर्यंत २२५ षटकार मारले असून रोहित शर्मा याने २०३ डावांत २२४ षटकार मारले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याने फक्त दोन षटकार मारले तरी तो महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडेल.

दरम्यान, एकदिवसीय सामन्यांत सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी पहिल्या क्रमांकावर असून त्याने ३५१ षटकार मारले आहेत. तर ख्रिस गेल ३१८ आणि सनथ जयसूर्या २७० षटकारांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याबरोबर आजच्या सामन्यात रोहित शर्माने दोन षटकार मारले तर तो सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर येईल.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.