‘या’ पाकिस्तानी खेळाडूने मागितले ‘BCCI’कडे काम ; म्हणाला, हार्दिक पांड्याला क्रिकेट ‘शिकवतो’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने काल विंडीजचा १२५ धावांनी दणदणीत पराभव करत आपला पाचवा विजय साजरा केला. याचबरोबर भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.या स्पर्धेत भारतीय संघ आतापर्यंत अपराजित आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

कालच्या सामन्यात भारताची मधली फळी ढेपाळल्यानंतर हार्दिक पांड्या आणि महेंद्र सिंग धोनी यांनी मोठी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. मात्र पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूने हार्दिक पांड्यावर नाराजी दर्शवली आहे. याविषयी पाकिस्तान पत्रकार साज सादिक याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

यामध्ये माजी खेळाडू अब्दुल रझ्झाक याने बीसीसीआयकडे काम मागितले आहे. यामध्ये तो म्हणत आहे की, “मला फक्त दोन आठवडे द्या, मी त्याला जगातला सर्वात चांगला ऑल राऊंडर बनवतो”, तसेच अब्दुल रझ्झाकने,  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या सामन्यात पांड्याला पहिल्यांदा खेळताना पाहिले. त्यावेळी रझ्झाकने “पांड्याच्या खेळीत सुधारणेची गरज आहे”, असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर अधिक बोलताना म्हणाला की, “जेव्हा तो फलंदाजी करतो तेव्हा त्याची फुट मुव्हमेंट आणि पायाची गती चूकीची आहे. मला फक्त दोन आठवडे द्या, मी त्याला जगातला सर्वात मोठा ऑलराऊंडर बनवतो”, अशी ऑफर भारतीय संघाला दिली आहे.

दरम्यान, भारतीय संघाचे सेमीफायनलमधील स्थान पक्के असताना पाकिस्तानी संघाला मात्र दुसऱ्या संघांच्या जय पराजयावर अवलंबून राहावे लागत आहे. गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तानचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे.

आरोग्यविषयक वृत्त – 

गोड’ चॉकलेटचे अतिसेवन शरीराच्या आरोग्यासाठी ‘कडू’

जाणून घ्या – फिटनेसक्वीन ‘जॅकलीन फर्नांडिस’ची दिनचर्या

भारतातील ब्रँडेड मीठात आढळले सायनाइडसारखे घातक घटक

वजन कमी करण्यासाठी वेगन डाएटला अनेकांची पसंती