‘वर्ल्डकप’मुळे TV विक्रेत्यांची ‘चांदी’, विक्रीत झाली ‘दुप्पट’ वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पावसाने भलेही क्रिकेट विश्वकरंडकातील काही सामन्यांवर पाणी फेरले असले तरीही भारतीय क्रिकेट रसिकांचा उत्साह मात्र अजिबात कमी होत नाहीये. क्रिकेट सामन्यांचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर आपले लहान टिव्ही बाजूला ठेवून मोठ्या स्क्रिनचे टीव्ही घेत आहेत. सोनी, एलजी, पॅनासोनिक, सॅमसंग इत्यादी टीव्ही कंपन्यांच्या मोठ्या टीव्हींच्या विक्रीमध्ये (५५ इंच किंवा त्यापेक्षा मोठा टीव्ही ) मागील वर्षीपेक्षा १०० टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

विक्रीमधील ही वाढ केवळ मोठ्या शहरांमध्येच नाही तर हुबळी, जबलपूर, रायपूर, रांची, कोची आणि नागपूर सारख्या छोट्या शहरांमध्ये देखील पाहावयास मिळाली. टीव्ही निर्मिती आणि विक्रेत्या कंपन्यांना असा अंदाज आहे कि पुढच्या काही सामन्यांवेळी हि विक्री आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल. याची तयारी देखील या कंपन्यांनी केली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तात्काळ कर्जे, कॅशबॅक सारख्या अनेक ऑफर बाजारपेठेत आणल्या आहेत.

सोनी इंडिया चे बिजनेस हेड सचिन राय यांनी म्हटल्यानुसार , ‘विश्वकरंडक जवळपास १० दिवसांपासून सुरु झाला असून आत्तापर्यंत आम्ही ५५ इंच किंवा त्यापेक्षा मोठ्या टीव्हींच्या विक्रीमध्ये मागील वर्षीपेक्षा दुप्पट वाढ झाली आहे.’

सॅमसंग इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार स्पर्धेत भारतीय क्रिकेट टीम जशीजशी पुढे जाईल तशी टीव्हीची विक्री वाढत जाईल. पूर्ण देशात मोठ्या स्क्रीन च्या टीव्हीची विक्री वाढत असून मे महिन्यात आमच्या कंपनीच्या ५५ इंचांपेक्षा मोठ्या टीव्हीची विक्री दुपटीने वाढली आहे. तर ७५ टक्के किंवा अधिक मोठ्या टीव्हीच्या विक्रीमध्ये ५ पटींनी वाढ झाली आहे. यामध्ये क्यूएलईडी टीव्हींचाही समावेश आहे.

मोठ्या टीव्हीच्या मागणीमध्ये वाढ का ?

पॅनासोनिक च्या बिजनेस हेड ने दिलेल्या माहितीनुसार क्रिकेट सामाने पाहण्यासाठी आता ग्राहकाला अधिक चांगला अनुभव हवा आहे. यासाठी ऍडव्हान्स फीचर्स, चांगल्या प्रतीचा आवाज, HD पिक्चर क्वालिटी इत्यादी सुविधा हव्या आहेत. या सुविधा केवळ मोठ्या स्क्रीन च्या टीव्ही मधेच मिळू शकतात त्यामुळे ग्राहक मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीला प्राधान्य देत आहेत. खेळांच्या हंगामात असे बऱ्याचवेळा दिसून येते.

अशा मोठ्या आकाराच्या स्क्रीनच्या टिव्हींची किंमत बाजारात जवळपास ५०,००० रुपयांपासून ते १ लाख ७५,००० रुपयांपर्यंत आहे. काही मॉडेल्सची किंमत मात्र खूपच जास्त आहे. तरीदेखील त्यांचा खप मात्र वाढत आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास सॅमसंग ने नुकताच ८के यूएचडी टीव्ही बाजारात आणला आहे. याची किंमत १०.९९ लाखांपासून ५९.९९ लाखांपर्यंत आहे. भारतात दरवर्षी जवळपास १.२५ कोटी टीव्हींची विक्री होते. यांतील १५ टक्के टीव्ही ५५ इंच पेक्षा मोठ्या स्क्रीन सिईज चे असतात.

आरोग्यविषयक वृत्त  (www.arogyanama.com) 

रात्री तुळशीची पाने टाकून दूध घ्या, होतील हे फायदे

#YogaDay2019 : मनशांतीसाठी योगासन हा सर्वात चांगला पर्याय

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार

हृदय निरोगी राहण्यासाठी घ्यावा ‘हा’ आहार

‘या’ सवयी ठरु शकतात घाताक, आरोग्याचे होते नुकसान

You might also like