ICC World Cup 2019 : ‘हा’ दिग्गज खेळाडू स्पर्धेदरम्यान बनला ‘बाप’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सर्व सामने जवळपास पार पडत आले असून या आठवड्याच्या शेवटी आपल्याला सेमीफायनलमधील चार संघ समजतील. या स्पर्धेत गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर असून भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानी असून इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ या स्पर्धेत भन्नाट फॉर्ममध्ये असून त्यांनी फक्त भारतीय संघाविरुद्धचा सामना गमावला असून त्यांनी याआधीच सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असल्याने आता त्यांना धोका नाही.

संघाबरोबरच त्यांचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा देखील उत्तम फॉर्ममध्ये असून विरोधी गोलंदाजांच्या चिथड्या उडवण्याचे काम त्याच्या फलंदाजीने करत असतो. मात्र आता यावेळी त्याने आपल्या चाहत्यांना एक नवीन खुशखबर दिली आहे. रविवारी त्याने ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. रविवारी रात्री त्याने ट्विटरवर एक फोटो शेयर करत ही आनंदाची बातमी दिली. यावेळी त्याने लिहिले होते की, रविवारी रात्री १०. ३० मिनिटांनी आम्ही आमच्या परिवारात एका नवीन सदस्याचे स्वागत केले. हा एक अद्भुत क्षण होता. आई – मुल दोघेही उत्तम असून तिच्या मोठ्या बहिणी देखील फार आनंदी आहेत.

दरम्यान, या स्पर्धेत डेव्हिड वॉर्नर भन्नाट फॉर्ममध्ये असून आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यांत त्याने ५१६ धावा केल्या असून २००३ च्या स्पर्धेतील सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी त्याला या स्पर्धेत आहे. ऑस्ट्रेलिया आपला शेवटचा साखळी सामना ६ जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेबरोबर खेळणार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –

सौंदर्य प्रसाधनेसुद्धा वाढवतात मधुमेहाचा धोका ! घ्यावी ‘ही’ काळजी

‘उभे राहून पाणी पिणे’ आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक

अनेक शारीरीक समस्या आणि आहाराबाबत आहेत ‘हे’ गैरसमज

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like