ICC World Cup 2019 : धोनीने पाकिस्तानच्या सामन्यात चाहत्यांना निराश केलं, पण ‘हा’ विक्रम नोंदविला

पोलीसनामा ऑनलाईन – भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळताना विराट कोहलीने इतिहास रचला असून भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा ११ हजार धावांचा विक्रम मागे टाकला आहे. विराट नंतर महेंद्र सिंह धोनी याने चाहत्यांची नाराजी केली असली तरी त्याने एक नवा विक्रम प्रस्थापीत केला आहे. धोनीने या सामन्यात केवळ एक धाव करुन बाद झाला.

महेंद्र सिंह धोनी याने विश्वचषकाच्या २२ व्या सामन्यात मैदानात उतरून एक नवा विक्रम केला आहे. पाकिस्तानविरुद्ध या सामन्यात खेळताना चौथा विश्वचषक स्पर्धेत तो खेळत आहे. धोनीचा हा भारताकडून ३४१ वा एकदिवसीय सामना आहे. मात्र, धोनीने भारताकडून ३४४ सामने खेळले आहेत. यातील तीन सामने आशिया इलेव्हनकडून खेळले आहेत. सचिन तेंडुलकर याच्यानंतर धोनीवर सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम धोनीच्या नावावर झाला आहे.

धोनीने आजचा सामना खेळून राहुल द्रविडला देखील मागे टाकले आहे. राहुल द्रविडने ३४० सामने खेळले आहेत. राहुल द्रविडने भारताकडून ३४४ सामने खळले असले तरी त्यामध्ये ४ सामने आशिया इलेव्हन संघाकडून तर एक सामना आयसीसी इलेव्हन कडून खेळला आहे. धोनीने ३४४ सामन्यामध्ये १० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच त्याने एक विकेट देखील घेतली आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
कांदा व लसूण एकत्र खा, होतील ‘हे’ फायदे
पेस्ट कंट्रोल पेक्षा हे उपाय करा, किटक जातील पळून
हातपायात ‘त्राण’ राहात नसेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय