ICC World Cup 2019 : क्रिकेटर शिखर धवनबाबत अतिशय मोठी बातमी

लंडन : वृत्‍तसंस्था – टीम इंडियाला मोठा धक्‍का बसला आहे. भारतीय संघाने विश्‍वचषकामध्ये दमदार सुरवात केली होती. शिखर धवनने साखळी सामन्यादरम्यान झंझावती शतक देखील ठाकले होते. सामन्यादरम्यान त्याच्या अंगठयाला मोठी दुखापत झाली. त्यानंतर शिखर 2 ते 3 सामने खेळू शकणार नाही असे सांगण्यात आले होते. शिखर धवन लवकरच संघात परतेल आणि चांगला खेळेल असे दस्तुरखुद्द विराट कोहलीने सांगितले होते. त्यानंतर भारतीय चाहत्यांच्या आशा पल्‍लवीत झाल्या होत्या. दरम्यान, आता मोठी बातमी समोर आली आहे. ती अशी की, शिखर धवनला वर्ल्डकपमधून माघार घ्यावी लागली आहे.

शिखर धवन संघात नसल्याने आता रिषभ पंतचा मार्ग मोकळा झाला आहे. शिखर धवन 3 आठवडयात दुखापतीतुन सावरेल असे सांगण्यात येत होते. मात्र तो 3 आठवडयात सावरणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याने उर्वरित सामन्यातून माघार घेतली आहे. आयएएनएस या वृत्‍तसंस्थेला बीसीसीआयच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे. धवन हा वर्ल्डकप खेळण्यासाठी फिट नसुन त्याने वर्ल्डकपमधून माघार घेतली आहे. शिखर धवन संघात नसल्याने भारतीय चाहत्यांना मोठा धक्‍का बसला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय

You might also like