ICC World Cup 2019 : धोनीमुळेच तू वर्ल्डकप जिंकलास, चाहत्यांकडून सचिन तेडुलकर ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या समान्यात भारत संकटात सापडला होता. भारतीय संघाचे सलामीवर या सामन्यात अपयशी ठरले होते. मात्र या सामन्यात विराट कोहली आणि केदार जाधव यांनी चांगली खेळी केली.

परंतू इतर खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. याच सामन्यात महेंद्रसिंग धोनीलाही चांगली खेळी करता आली नाही. त्यावरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने धोनीवर टीका केली होती. त्यावर धोनीच्या चाहत्यांनी सचिनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत संथ गतीची खेळी करत होता. धोनीनं या सामन्यात ५२ चेंडूंत २८ धावा केल्या. मधल्याफळीत धोनी व जाधव यांनी ५७ धावांची भागीदारी केली. त्यांच्या संथ खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तेंडुलकरने यावर नराजी व्यक्त केली. मी निराश झालो, यापेक्षा चांगली खेळी करता आली असती.

धोनी व जाधव यांच्या भागीदारीवर मी असमाधानी आहे. ती अत्यंत संथ भागीदारी होती. आम्ही फिरकीपटूंच्या ३४ षटकांत केवळ ११९ धावाच करू शकलो. याचा गांभीर्यानं विचार होण्याची आवश्यकता आहे, असं तेंडुलकरने म्हटलं. तसंच प्रत्येक षटकात २-३ निर्धाव चेंडू खेळले गेले. ३८व्या षटकात विराट कोहली माघारी परतल्यानंतर ४५व्या षटकापर्यंत आपण अधिक धावा केल्याच नाहीत. मधल्या फळीकडून आतापर्यंत अपेक्षित योगदान मिळालेले नाही आणि त्यामुळे अन्य फलंदाजांवर दडपण येत आहे, असं तेंडुलकरने म्हटलं.

सचिन तेंडुलकरच्या वक्तव्यानंतर धोनीच्या चाहत्यांनी त्याच्यावर आगपाखड केली आहे. नेटकऱ्यांनी तेंडुलकरला त्याच्याच काही संथ खेळीचीही आठवण करून दिली. तसंच सचिन तू वर्ल्ड कप जिंकलास तो धोनीमुळेच, अशा अनेक कमेंट करत सचिनला ट्रोल केले आहे.

https://twitter.com/NeecheSeTopper/status/1143218629539840000

https://twitter.com/prime861/status/1143343088259063808

https://twitter.com/Twinklingsania/status/1143229959307030528

 

आरोग्य विषयक वृत्त

‘या’ टिप्स वापरून मधुमेहावर करा नियंत्रण

‘हा’ आहे जपानी सर्वात स्वस्त उपाय ज्याने तुम्ही ठेवू शकतात तुमचे वजन नियंत्रणात

जरा जपून, ‘या’ कारणांमुळे होऊ शकते केस गळती

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी