Video : ICC World Cup 2019 : सेमीफायनलपूर्वीच हार्दिक पंड्या होतोय ‘ट्रोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा पहिला सामना रंगणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण विजयी होणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून आहे. भारतीय संघाने या सामन्याआधी काल कसून सराव देखील केला. या सामन्याचे सर्वांनाच दडपण असले तरीही भारतीय संघातील काही खेळाडू सामन्याआधी मजा करताना दिसून येत आहेत.

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या एका वेगळ्याच कारणामुळे सध्या ट्रोल होताना दिसून येत आहे. हार्दिक पंड्याने ‘टिक टॉक’चा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर आता या व्हिडीओवरून हार्दिक पंड्याला ट्रोल केले जात आहे.

या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात असले तरी या सामन्यात भारतीय संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. त्याचबरोबर या सामन्यात पावसाचे सावट असल्याने भारतीय प्रेक्षकांना चिंता सतावत आहे. मात्र साखळी सामन्यांत भारत पहिल्या क्रमांकावर असल्याने जरी हा सामना पावसामुळे रद्द झाला तरी भारतीय संघ फायनलमध्ये जाणार आहे. मात्र क्रीडा रसिक हा सामना व्हावा म्हणून उत्सुक आहेत.

विराटचा व्हिडीओ व्हायरल

या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये विराट कोहली त्याच्या अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये झालेल्या सामन्याविषयी बोलताना दिसून येत आहे. त्यावेळी कोहलीला पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता. त्यावर कोहलीने, … असाही एक दिवस येईल, हे माहिती नव्हतं, असं म्हटले आहे.

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

पावसाळ्यात ‘अस्वच्छ’ पाणी पिल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई