ICC World Cup 2019 : हिट मॅन रोहित शर्माचा भारत-पाक सामन्यात जलवा, नॉट आऊट 100 (85)

पोलीसनामा ऑनलाइन – भारताचा स्टार फलंदाज आणि हिट मॅन रोहित शर्माने भारत आणि पाकिस्तानदरम्यान चालु असलेल्या सामन्यात नाबाद शतक ठोकले आहे. सुरवातीला पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पावसाच्या भरवशावर असलेल्या पाकिस्तानच्या पदरी निराशाच पडली. कारण, केएल राहूल आणि रोहित शर्माने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत 23 ओव्हरमध्ये 134 धावा काढल्या.

केएल राहूल थोडा संथ गतीने खेळत होता. दरम्यान, त्याने एक षटकार लावला. त्यानंतर वहाब रियाजने त्याला बाद केले. भारतीय कर्णधार विराट मैदानावर आला. त्याने देखील लागलीच धाव काढण्यास सुरवात केली. हिट मॅन रोहितची बॅट तळपत होती. त्याने पाकिस्तानच्या जवळपास सर्वच गोलंदाजाची धुलाई केली.

भारत-पाक दरम्यान आत्‍तापर्यंत विश्‍वचषकात झालेल्या सामन्यात पाकिस्तानला कधीही विजय मिळालेला नाही. त्याचीच पुर्नरावृत्‍ती आज होईल असे जाणकारांचे मत आहे. मॅनचेस्टर येथे होत असलेल्या सामन्यावर सुरवातीला मात्र पावसाचे सावट होते. प्रत्यक्षात सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता नाकारण्यात आली. मात्र, पाकिस्तानने पावसाच्या आशेवर नाणेफेक जिंकून देखील प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानला हा निर्णय खुप महाग पडला. रोहित शर्माने 85 चेंडूचा सामना करून नाबाद 100 धावा केल्या आहेत. सामना चांगलाच रंगतदार होईल पण त्यामध्ये विजय निश्‍चितपणे भारताचाच होईल असे क्रिकेटच्या जाणकारांचे म्हणणे आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
‘या’ प्रकारचा नाष्टा आरोग्यासाठी फायदेकारक
नैसर्गिक मेहंदी ‘या’ आजारांवरही उपायकारक
आरोग्यनामाच्या फेसबुक पेजला लाईक करा

Loading...
You might also like