वर्ल्डकप २०१९ : ‘एलइडी’ बेल्सबाबत आयसीसीचे स्पष्टीकरण

लंडन : वृत्तसंस्था – क्रिकेटच्या महासंग्रामाला इंग्लंडमध्ये ३० मे पासून सुरुवात झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवत आपला या स्पर्धेतील दुसरा विजय साजरा केला. मात्र या सामन्यात वॉर्नर फलंदाजी करत असताना, स्टम्पला चेंडू लागला पण बेल्स न पडल्यानं वॉर्नर थोडक्यात वाचला. त्यामुळे या बेल्स बदलण्याची मागणी जोर धरू लागली असताना आयसीसीने या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

याविषयी बोलताना आयसीसीने म्हटले आहे कि, विश्वचषकात वापरण्यात येत असलेली कोणतीही गोष्ट मध्येच बदलता येणार नाही. त्यामुळे या स्पर्धेच्या तसेच आयसीसीच्या देखील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहील, असे आयसीसीने म्हटले आहे. सर्व संघांसाठी समान आणि एकसारख्याच वस्तूंचा वापर केला जाईल असेदेखील आयसीसीने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मात्र बुमराहच्या पहिल्याच ओव्हरमध्ये एक अजब प्रकार घडला. वॉर्नर फलंदाजी करत असताना, स्टम्पला चेंडू लागला पण बेल्स न पडल्यानं वॉर्नर थोडक्यात वाचला. या सहा प्रकारच्या घटना या स्पर्धेत आतापर्यंत पाचवेळा घडले आहे. या बेल्स वजनदार असल्याने हा प्रकार होत असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, या सामन्यानंतर देखील दोन्ही संघांच्या कर्णधारानी देखील याविषयी तक्रार करून चिंता व्यक्त केली होती. यापूर्वी देखील ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यावेळी मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर ख्रिस गेल बाद होण्यापासून वाचला होता. तेव्हाही चेंडू स्टम्पला लागल्यावर बेल्स पडल्या नव्हत्या. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात लंकेच्या करुणारत्नेला जीवदान मिळालं. त्यामुळे अनेक संघाना याचा फटका बसला आहे.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like