ICC World Cup 2019 : मैदानाबाहेर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या माजी खेळाडूंमध्ये ‘राडा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत काल झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या सामन्यात दोन्ही देशांचे माजी खेळाडू एकमेकांशी भिडले. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ऍडम गिलक्रिस्ट हे ट्विटरवर एकमेकांशी भिडले. मायकल वॉन याने केलेल्या ट्विटनंतर या युद्धाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्याने ट्विट करून ऑस्ट्रेलियाची या ट्विटमध्ये त्याने टर उडवली होती. त्यानंतर गिलक्रिस्ट याने ट्विट करत वॉन याला मूर्ख म्हटले.

या ट्विटरयुद्धला सुरुवात सामना चालू झाल्यानंतर लगेच झाली. सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद १४ अशी झाल्यानंतर वॉन याने ट्विट करत ऑस्ट्रेलियाची टर उडवली. त्या सुरुवातीच्या पडझडीनंतर संपूर्ण सामन्यात सावरू शकला नाही. त्यांचा संपूर्ण संघ २२३ धावत करू शकला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना देखील संपूर्ण सामन्यात विकेट घेण्यासाठी मोठे कष्ट करावे लागले. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या मिचेल स्टार्क त्यालादेखील त्या सामन्यात प्रचंड मार बसला. त्यानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी शानदार सुरुवात करत १७. २ षटकात १२४ धावांची भागीदारी करून इंग्लंडचा विजय सोपा केला.

त्यानंतर पुन्हा एकदा मायकल वॉन याने ट्विट करत म्हटले कि, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी बूट काढत अनवाणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा एडम गिलक्रिस्ट याला याचा राग आल्यानंतर त्याने वॉन याला मूर्ख म्हणत टीका केली. मात्र पुन्हा मायकल वॉन याने अनवाणी पायांचा जिफ (GIF) फाइल पोस्ट करत एडम गिलक्रिस्ट याला डिवचले. दरम्यान, काळ झालेल्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात इंग्लडने ऑस्ट्रेलियाचा ८ विकेटने दारुण पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.

आरोग्यविषयक वृत्त

तुमच्याही स्वयंपाकघरात आहे, हे अनेक आजारांवरील रामबाण औषध

‘हे’ आहेत प्रोस्टेट कॅन्सर बाबतचे ‘समज-गैरसमज’, जाणून घ्या

डोळयातून पाणी येतंय मग ‘या’ ४ गोष्टींचा काळजी घ्या

बहुजननामा

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या कामाची पॅलेस्टाईनने घेतली दखल, पॅलेस्टाईन सरकारकडून सन्मान

मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती नाही, सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

आघाडी काळात रखडलेल्या मराठा मुलांना न्याय, परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे भवितव्य अधांतरी

सिनेजगत

Photo : ४२ वर्षांच्या ‘या’ अभिनेत्रीने केलं गुपचूप लग्न !

Photos : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रेग्नेंट अॅमी जॅक्शनची इटलीतील वॅकेशनदरम्यान ‘धमाल’ !

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात फसवणुकीचा FIR

Loading...
You might also like