ICC World Cup 2019 : टीम इंडिया ‘चॅम्पीयन’ बनली तर होणार ‘मालामाल’, ‘एवढे’ कोटी रूपये ‘बक्षिस’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आता सेमीफायनल सामने होणार असून आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनलचा सामना होत आहे. सर्व क्रीडा रसिकांचे या सामन्याकडे लक्ष लागले असून या स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश करण्याची भारताकडे मोठी संधी आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफड मैदानावर हा सामना रंगणार असून यासाठी सोमवारी भारतीय संघाने जोरदार सराव केला.

मागील रेकॉर्डवर नजर टाकली तर या सामन्यात भारतीय संघाचे पारडे सध्या जड असून या सामन्याकडे सर्व जगाचे लक्ष लागून आहे. यावेळी भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. त्यामुळे २०११ नंतर पुन्हा एकदा भारतीय संघ विश्वविजेता ठरणार कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जर भारतीय संघाने हा वर्ल्डकप जिंकला तर भारतीय संघावर पैश्याचा पाऊस पडणार आहे.

इतके मिळणार पैसे

संपूर्ण स्पर्धेतील एकूण इनामाची रक्कम यावेळी एकूण ७० कोटी रुपये असून विजेत्या संघाला २८ कोटी रुपये इनामाच्या स्वरूपात मिळणार आहेत. त्याचबरोबर उपविजेत्या संघाला देखील घसघशीत रक्कम मिळणार असून त्यांना १४ कोटी करून मिळणार आहेत. त्याचबरोबर सेमीफायनलमध्ये पराभूत होणाऱ्या संघाना देखील प्रत्येकी साडेपाच कोटी रुपये इनामच्या स्वरूपात मिळणार आहेत.

क्रिकेट वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाची रक्कम ही विम्बल्डन जिंकणाऱ्या खेळाडूला मिळणाऱ्या पैश्यापेक्षा खूप अधिक आहे. मात्र ‘फीफा वर्ल्ड कप’ जिंकणाऱ्या संघाला मिळणाऱ्या राशीच्या तुलनेत काहीच नाही. पुरुष फीफा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला २६१ कोटी रुपये इनामाच्या स्वरूपात मिळत असतात. तसेच महिलांच्या फीफा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला २७.५ कोटी रुपये मिळतात. विम्बल्डन जिंकणाऱ्या पुरुषाला आणि महिलेला विजेती रक्कम म्हणून १९.३ करोड रुपये देण्यात येतात.

१४ जुलैला होणार फायनल

या स्पर्धेची फायनल ही १४ जुलै रोजी होणार आहे. सेमीफायनलमधील चार संघ म्हणजेच भारत आणि न्यूझीलंड आज भिडणार आहेत तर इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया गुरुवारी भिडणार असून रविवारी हॊणाऱ्या फायनलमध्ये कोण खेळणार हे लवकरच स्पष्ट होईल. त्यामुळे या सामन्याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like